ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोटची एसटी सेवा संध्याकाळनंतर सुरळीत

 

 

अक्कलकोट, दि.१९ : डिझेलची दरवाढ आणि उत्पन्नाचा अभाव यामुळे अक्कलकोट आगारातील एसटी सेवा शुक्रवारी ठप्प झाली होती. त्यामुळे दिवसभर प्रवाशांचे प्रचंड हाल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. फक्त बाहेरच्या डेपोच्या काही मोजक्या गाड्या सुरू होत्या. अक्कलकोट आगाराच्या गाड्या मात्र बसस्थानकामध्ये थांबून होत्या.यामुळे ग्रामीण भागात जाणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. डिझेल दरवाढ दिवसेंदिवस होत आहे. त्याचा फटका बस बसगाड्यानाही बसत आहे. त्याशिवाय कोरोना महामारीचे संकट आहे त्यामुळे देखील प्रवाशांची संख्या रोडावत आहे. परिणामी एसटीचे उत्पन्न कमी होत चालले आहे. त्यामुळे डिझेल अभावी गाड्या बंद ठेवण्याची वेळ आली आहे. यासंदर्भात दुपारनंतर वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन निर्णय झाल्यानंतर संध्याकाळी बससेवा सुरळीत झाली आहे,डिझेल देखील मिळाले आहे, असे अक्कलकोट बस स्थानकाचे आगार प्रमुख रमेश म्हंता यांनी बोलताना सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!