ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट तालुका कोरोना अपडेट,आत्तापर्यंत ७५ जणांचा गेला बळी

 

मारुती बावडे

अक्कलकोट, दि.१५ : अक्कलकोट तालुक्यात सध्या ११ कोव्हिडं रुग्णावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विन करजखेडे यांनी विश्व न्यूज मराठी ‘शी’ बोलताना दिली.सध्या टेस्टिंगचे प्रमाण कमी आहे. लोक अजूनही टेस्टिंगसाठी घाबरत आहेत. लस घेण्यासाठी पुढे येत नाहीत ही वस्तुस्थिती असून सर्वांनी यासाठी पुढे यावे,असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करत आहोत.

तालुक्‍यात पहिल्यांदा गेल्या मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून आतापर्यंत १ हजार ३२५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामध्ये ग्रामीणमधील ९५५ तर शहरातील ३७० रुग्णांचा समावेश आहे. यात ग्रामीणमध्ये ४९ तर शहरांमध्ये २६ जणांचा असे ७५ जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत १ हजार २३९ जण कोरोना मुक्त झाले आहेत. सध्या सीसीसी सेंटरमध्ये २ होम आयसोलेशनमध्ये १ आणि इतर हॉस्पिटलमध्ये ८ असे एकूण ११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत,अशी माहिती देखील डॉ. करजखेडे यांनी दिली.

ग्रामीण भागांमध्ये सध्या रॅपिड एंटीजन टेस्ट व आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येत असून ज्यांना कोरोना सदृश्य लक्षणे दिसत असतील, त्यांनी स्वतःहून टेस्टिंग करून घ्यावी,असे आमचे मत आहे. सध्या प्रशासनाच्यावतीने देखील जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत त्यांच्या संपर्कातील हाय रिस्क मधील लोकांना संपर्क साधून त्या लोकांचे आम्ही आरटीपिसीआर करत आहोत तसेच लक्षण असताना जर रॅपिड टेस्ट निगेटिव आली
तरी देखील आम्ही पुन्हा आरटीपिसीआर
करत आहोत, असे देखील ते म्हणाले.याबाबतीत तालुक्यातील जनतेने सतर्कता बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन डॉ.करजखेडे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!