---Advertisement---

पाण्याचे नियोजन लोकसहभागातून झाले पाहिजे : कोळी, हन्नुर येथे ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ कार्यक्रम उत्साहात

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.१५ : जीवनात पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असुन त्यांचे नियोजन हे लोकसहभागातून झाले पाहिजे,असे प्रतिपादन अक्कलकोटचे गटविकास अधिकारी महादेव कोळी यांनी केले. अक्कलकोट तालुक्यातील नेहरू युवा केंद्र व एस.के ग्रुप हन्नूर यांच्या संयुक्त विद्यमाने युवा संसद व पाणी अडवा पाणी जिरवा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपसरपंच शरणाप्पा हेगडे उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. हन्नुरचे उपसरपंच सागर कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पंचायत समिती गटविकास अधिकारी महादेव कोळी यांनी मार्गदर्शन केले.यावेळी जेष्ठ पत्रकार अरविंद जोशी व प्रा संतोष नरे यांचे पाणी अडवा, पाणी जिरवा विषयावर चर्चा करण्यात आली.यावेळी नेहरू युवा केंद्र सोलापूर जिल्हा समन्वयक अजित कुमार , ग्रामविकास अधिकारी दयानंद बिराजदार, वैद्यकीय अधिकारी डॉ. बिराजदार, तंटामुक्त अध्यक्ष सिद्राम पुजारी आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नेहरू युवा केंद्र अक्कलकोट समन्वयक प्रा. गौतम बाळशंकर यांनी केले. यावेळी तुळशीराम इरवाडकर , लक्ष्मण बाळशंकर, लक्ष्मण पुजारी, सागर बंदीछोडे, कोंडीबा सोनकांबळे, संतोष बाळशंकर, विनोद राठोड उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सोपान निक्ते यांनी केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!