अक्कलकोट ४८ तर दुधनी बाजार समितीसाठी ३२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात;दुधनीत म्हेत्रे गटाच्या दोन जागा बिनविरोध
अक्कलकोट, दि.२० : तालुक्यातील दुधनी आणि अक्कलकोट बाजार समितीचे अंतिम चित्र गुरुवारी स्पष्ट झाले.उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी अक्कलकोटसाठी ५६ जणांनी माघार घेतली तर दुधनीमध्ये ४३ जणांनी माघार घेतली. त्यामुळे अक्कलकोट साठी ४८ उमेदवार तर दुधनीसाठी ३२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.नेते मंडळींची दुधनी आणि अक्कलकोटमध्ये सकाळपासूनच उमेदवारी अर्ज माघार घेण्याची लगबग
सुरू होती.मागच्या दोन दिवसांपासून पडद्याआड अक्कलकोट बाजार समितीसाठी बिनविरोधची चर्चा सुरू होती असे कळते
परंतु ही चर्चा आता ‘ वरून ‘ होती.हे सिद्ध झाले.अक्कलकोट बाजार समितीसाठी छाननीपूर्वी १०६ अर्ज होते.त्यात ७ अर्ज नामंजूर झाले.त्यानंतर ९९ राहिले होते.
पुढे ५ जणांनी अपील केले होते.अपील मान्य केल्यामुळे पुन्हा १०४ अर्ज राहिले.गुरुवारी ५६ जणांना माघार घेतली.१८ जागांसाठी ४८ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत.यात दोघा ते तिघांचा अर्ज डबल आहेत.अंतिम यादी चिन्हांकित यादी उद्या (शुक्रवारी) जाहीर होणार आहे.या ठिकाणी माजी आमदार सिद्रामप्पा पाटील व आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या विरोधात माजी
मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मल्लिकार्जुन पाटील, दत्ता शिंदे, आनंद तानवडे, संजय देशमुख ,तुकाराम बिराजदार, दिलीप सिद्धे ही सर्वपक्षीय नेते मंडळी
एकवटले आहेत.दुधनी बाजार समितीच्या निवडणूकीत व्यापारी गटातून दोन जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित १६ जागांसाठी या ठिकाणी निवडणूक लागली आहे.याठिकाणी एकूण ७७ अर्ज होते.४३ जणांनी माघार घेतली आहे आता १६ जागांसाठी ३२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.याठिकाणी माजी मंत्री
सिद्धाराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलमधून व्यापारी मतदार संघातून सातलिंगप्पा परमशेट्टी व चंद्रकांत येगदी
हे दोघेही बिनविरोध झाले आहेत.उर्वरित
१६ जागांसाठी निवडणूक लागली आहे.या ठिकाणी सत्ताधारी माजी मंत्री म्हेत्रे यांच्या पॅनल विरोधात आमदार कल्याणशेट्टी व माजी आमदार पाटील हे एकत्र आले आहेत.या बाजार समितीसाठी ३० एप्रिल मतदान व
मतमोजणी होणार आहे.