ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोटमध्ये पर्यावरणपुरक गणेशमूर्ती प्रशिक्षण कार्यशाळा

अक्कलकोट, दि.१६ : श्री गणेशयुग सोलापूर आयोजित पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याची मोफत कार्यशाळा गुरुवार दि. १८ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते १ या कालावधीत प्रियदर्शनी मंगल कार्यालय अक्कलकोट येथे आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेसाठी अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ,श्री स्वामी समर्थ समाधीमठ देवस्थान, सखी ग्रुप अक्कलकोट तसेच माझी वसुंधरा, नगर परिषद अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम संपन्न होणार आहे.या कार्यशाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनीना श्री गणेशयुग सोलापूरचे संस्थापक विकास गोसावीसर गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देणार आहेत.कार्यशाळेत विद्यार्थांना सर्व साहित्य मोफत दिले जाणार आहे, कार्यशाळेस सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल.विद्यार्थ्यांनी बनविलेली याच गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना त्यांना आपल्या घरात करता येईल. ही कार्यशाळा शालेय विद्यार्थ्यांना मोफत आहे.यासाठी गुगल फॉर्म द्वारे नाव नोंदणी अनिवार्य आहे.कार्यशाळेसाठी लागणारे साहित्य,माती,मोफत जाईल.सर्व विद्यार्थ्यांनी हात पुसण्यासाठी नॅपकिन, पाण्याचा मग, वॉटर बॉटल घेऊन यावे. प्रशालेतील सातवी,आठवी, नववी, दहावी च्या विध्यार्थी व विद्यार्थिनीना या कार्यशाळेत सहभागी होता येईल.प्रत्येक शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांची यादी खाली दिलेल्या नंबर वर एक्सेल स्वरुपात पाठवावी.अक्कलकोट मधील सर्व शाळा सहभागी होत आहेत. तरी आपणही आपल्या शाळेचा सहभाग नोंदवावा असे आवाहन गणेशयुग परिवाराचे आसावरी गांधी, जितेंद्रकुमार जाजू, डॉ. सतीश बिराजदार आदींनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!