---Advertisement---

रोटरी क्लब तर्फे एकात्मता तिरंगा बुलेट रॅली,अक्कलकोटमध्ये स्वातंत्र्याचा जागर

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.१६ : भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून देशप्रेमाचा जागर म्हणून रोटरी क्लब अक्कलकोट तर्फे अक्कलकोट शहरातील प्रमुख मार्गावरून तिरंगा एकात्मता बुलेट रॅली काढण्यात आली.या रॅलीला शहरवासीयांचा चांगला प्रतिसाद मिळाला.ए – वन चौक येथील हुतात्मा स्तंभास पुष्प चक्र अर्पण करून स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करून रॅलीची सुरुवात करण्यात आली.तत्पूर्वी ओंकार जाजू यांनी दांडपट्टा
फिरवून आपली कला सादर केली व ती लक्षवेधी ठरली.या रॅलीमध्ये आमदार सचिन कल्याणशेट्टी,वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे,अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले हेही रॅली मध्ये सहभागी झाले होते.शेकडो बुलेट प्रेमींनी देशातील पारंपारिक वेषभुषा करून लोकांचे लक्ष वेधून घेतले. बुलेट रॅलीमध्ये जय हिंद, भारत माता की जय, वंदे मातरम च्या जय घोषात अक्कलकोट शहराच्या प्रमुख मार्गावरून निघाली आणि ही रॅली अत्यंत उत्स्फूर्तपणे शांततेत पार पडल्याची माहित अध्यक्ष डॉ. बसवराज चिणकेकर यांनी दिली. रॅलीचा समारोप मार्केट कमिटी कंपाऊंड येथे करण्यात आला. रॅलीत सहभागी बुलेट प्रेमी साठी मार्केट कमिटी प्रशासना कडून अल्पोपहार व चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.ही
रॅलीचे संयोजन कार्यक्रम प्रमुख एजाज मुतवल्ली,सचिव वैजीनाथ तालीकोटी,दत्ता कटारे,सतीश शिंदेसह सर्व रोटरी पदाधिकारी व सदस्य यांनी परिश्रम घेतले.या एकत्मता रॅलीमध्ये निनाद शहा,डॉ.विपुल शहा,विलास कोरे, प्रकाश घिवारे, नीलकंठ कापसे, दिनेश पटेल,प्रशांत वाली,राजकुमार कोकळगी, मनोज काटगाव, नितीन पाटील, ओंकार उटगे,ऍड.सुनील बोराळकर, परवेज कुरनूरकर, जितेंद्रकुमार जाजू, सोमू चौलगी, नूर अहमद शेरीकर, महेश कुलकर्णी,रिझवान बागवान, साकिब शेख, अमीन मुजावर मजहर मुजावर, पंकज झिंगाडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!