अक्कलकोट ग्रँड फेस्टिवलला थाटात प्रारंभ ; व्यापार वाढीला चालना; आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे प्रतिपादन
अक्कलकोट, दि.१९ : अक्कलकोट ग्रँड फेस्टिवलमधून अक्कलकोटची उंची तर वाढेलच परंतु उद्योग व्यापार वाढीला देखील चालना मिळेल, असे प्रतिपादन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले. गुरुवारी, अक्कलकोट येथे १९ ते २३ जानेवारीपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या ग्रँड फेस्टिवलचे उद्घाटन खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
पुढे बोलताना आमदार कल्याणशेट्टी म्हणाले, कोणत्याही शहराची श्रीमंती ही त्या व्यापाऱ्यावरती अवलंबून असते. जर व्यापार मोठ्या प्रमाणात होत असेल तर त्या शहरात येणाऱ्या नागरिकांची व ग्राहकांची गर्दी अधिक असते. शहरात वाढलेली गर्दी ही व्यापाऱ्यांची श्रीमंती असते म्हणून अक्कलकोट सारख्या ग्रामीण भागात ग्रँड फेस्टिवलचे आयोजन करून अक्कलकोट व्यापारी डीलर्स असोसिएशनने शहराचा लौकिक वाढवला आहे. यासाठी आपले संपूर्ण सहकार्य असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
नगरसेवक महेश हिंडोळे यांनीही अक्कलकोट हे तीर्थक्षेत्राचे ठिकाण आहे धार्मिक दृष्ट्या या शहराचा विकास होत आहे तसे आता व्यापाऱ्यांच्या दृष्टीने हे शहर आगामी काळात पुढे जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अध्यक्ष दिनेश पटेल यांनी प्रास्ताविक करताना हा उपक्रम आयोजित करण्यामागची भूमिका विशद केली स्थानिक व्यापाराला चालना मिळावी यासाठी हे फेस्टिवल आयोजित केले आहे. या फेस्टिवलमध्ये एकूण ४० स्टॉल असणार असून याचे बजाज फायनान्स सहप्रायोजक आहेत. याला तालुक्यातील व्यापारी वर्ग व जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा. प्रत्येक वस्तूंच्या खरेदीवर भरघोस सूट देण्यात येणार आहे. याठिकाणी ऑनलाइन पेक्षाही कमी दरात वस्तू उपलब्ध होणार आहेत. आकर्षक गिफ्ट ठेवण्यात आले आहे.तिकीट विक्रीवरती सुद्धा लकी ड्रॉ कुपन ठेवले आहे.यातून भाग्यवान विजेत्यास भेटवस्तू मिळणार आहे.
शून्य टक्के व्याजदरात या सर्व वस्तू उपलब्ध होतील, अशी माहिती सचिव गजानन पाटील यांनी दिली. हे फेस्टिवल १९ ते २१ जानेवारी दरम्यान दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत तर २२ जानेवारी व २३ जानेवारी रोजी दुपारी १२ ते रात्री ९ वाजेपर्यंत चालू राहणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रमास स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले ,अक्कलकोट व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मल्लिनाथ साखरे, मुस्लिम समाज ट्रस्टचे अध्यक्ष एजाज मुतवल्ली, लायन्स क्लबचे अध्यक्ष मल्लिनाथ मसूती, स्वामींनाथ हिप्परगी, राजशेखर हिप्परगी, चेतन साखरे, विलास कोरे, डॉ.विपुल शहा,दत्ता कटारे, वैजिनाथ तालीकोटी, प्रकाश घिवारे, सतीश शिंदे, निरंजन शहा, बालाजी कटारे, दिलीप महिंद्रकर, विकास जकापुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन पाटील यांनी केले आभार राजकुमार कोकळगी यांनी मानले.