ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट संस्थांनच्या दसरा महोत्सवाने इतिहासाला मिळाला उजाळा; श्रीमंत मालोजीराजेंच्या उपस्थितीत सीमोल्लंघन कार्यक्रम थाटात

मारुती बावडे

अक्कलकोट, दि.६ : अक्कलकोट संस्थान तर्फे साजरा होणाऱ्या दसरा महोत्सवाला यावर्षी पुन्हा एकदा दिमाखात सुरुवात करण्यात आली. जुन्या राजवाड्यात पार पडलेल्या या ऐतिहासिक परंपरेला अक्कलकोटकरांनी प्रतिसाद देत अक्कलकोट संस्थांनचा इतिहास पुन्हा एकदा नव्याने जागृत केला. आज दिवसभर अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले यांच्या हस्ते शस्त्रपूजेसह विविध पूजा पार पडल्या. यामुळे राजवाडा परिसरात मंगलमय वातावरण पाहायला मिळाले. पहाटेपासूनच या महोत्सवाची धांदल सुरू होती. सायंकाळी सीमोल्लंघनाचा कार्यक्रम राजेशाही पद्धतीने पार पडला. यात अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजी राजे भोसले यांच्यासह मानकरी, सेवेकरी,हजारो नागरिक झाले होते.

प्रारंभी जुना राजवाडा येथून हे सीमोल्लंघन मिरवणूक फत्तेसिंह चौक, कारंजा चौक, शरणमठ या मार्गावरून शरणमठा समोरील संस्थांननी संगोपित केलेल्या शमी वृक्षतळी श्री गणेश पूजेने झाले. पूजा करून परतत असताना अक्कलकोटच्या मुख्य रस्त्यावरून असंख्य नागरिक व्यापारी महिला आदींनी अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे यांचे औक्षण करून पुष्पवृष्टी केली. परत येऊन जुन्या राजवाड्यातील देवीचे पूजन व आरती संपन्न झाली.

यानंतर शमी वृक्ष व आपटा वृक्ष व शस्त्रपूजा संपन्न झाली.यानंतर श्रीमंत मालोजीराजे यांनी या वृक्षाच्या फांदी शस्त्राने प्रतिकात्मक रित्या तोडल्या व हेच सोने रुप्याचे भांडार सर्व नागरिकांना लुटीसाठी खुले करून दिले. यानंतर श्रीमंत मालोजीराजे यांनी जमलेल्या सर्व मानकरी व नागरिकांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. याचवेळी श्रुती स्वामी हिने रेखाटलेल्या श्री स्वामी महाराजांच्या तैलचित्राचे अनावरण श्रीमंत मालोजीराजे यांच्या हस्ते झाले. यावेळी श्रीमंत मालोजीराजे भोसले यांचे थोरले बंधू सयाजीराजे भोसले व त्यांच्या आईसाहेब जय प्रभादेवी राजे भोसले आणि त्यांचे मामा आशिष कदम तसेच त्यांचे मित्र एडवोकेट शुभम वडणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या सोहळ्याला वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, जय हिंद शुगरचे चेअरमन गणेश माने देशमुख, माजी सभापती महिबूब मुल्ला यांच्यासह मानकरी मुकुंद घाडगे, महेश शिर्के, विलासराव जाधव,गणेश इंगळे, सागर इंगळे, संभाजी निंबाळकर, अक्षय राजेशिर्के, रोहन राजे शिर्के, महेश काटकर, गणेश काटकर, दिलीप जाधव, उल्हास निंबाळकर, राहुल निंबाळकर, शिवाजी गुजर, सूरज निंबाळकर, तानाजी बावणे, अशोक जगताप, दिगंबर घाटगे आदी उपस्थित होते. या सोहळ्याचे सूत्रसंचालन मानकरी बाबासाहेब निंबाळकर यांनी केले.

दांडपट्ट्याने वेधले नागरिकांचे लक्ष

आर्किटेक्ट ओंकार जाजू यांने भारतीय युद्धकला दांडपट्ट्याचे विविध प्रकार यावेळी सादर केले. यात डाव्या उजव्या हाताने दांड पट्टा फिरवणे, तसेच डोळ्यावर पट्टी बांधून देखील दांडपट्टा फिरवला.या कलेचे मालोजीराजे भोसले यांनी विशेष कौतुक केले. याकडे उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!