
अक्कलकोट, दि.१९ : अक्कलकोट
तालुक्यात मागील दोन दिवसात आलेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारा व गारपीटीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी आमदार सचिन कल्याणशेट्टी व तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी केली.याबाबत उद्या आढावा बैठक
बोलवण्यात आली आहे.या बैठकीत नुकसानीचा आढावा घेण्यात येणार आहे.मागच्या दोन दिवसात तालुक्याच्या
अनेक भागात शेती पिकांचे आणि फळबागांचे नुकसान झाल्याचे पाहणी दरम्यान शेतकऱ्यांनी सांगितले.तालुक्यातील
प्राथमिक माहिती प्राप्त झाल्यानंतर संगोगी आ,तोरणी,जेऊर ,जेऊरवाडी ,जैनापूर या भागाचा दौरा करण्यात आला.यात
विशेष करून फळ पिकांचे व शेती पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.या पाहणीत द्राक्ष बाग ,केळी, पपई ,टोमॅटो ,
टरबूज या नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे जेऊर भागात दिसून आले. संगोळी आ,तोरणी, बोरोटी या भागांमध्ये ही अंशतः नुकसान झाल्याचे दिसुन आले. याबाबत उद्या (सोमवारी) सकाळी तलाठी मंडळ अधिकारी,कृषीचे कर्मचारी यांची आढावा बैठक बोलावण्यात आली आहे व संबंधित नुकसानीबाबतचे पंचनामे करून त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करण्यात येणार आहे,अशी माहिती तहसीलदार सिरसट यांनी दिली.