ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट नगरपालिकेने हटवले तारामाता उद्यानाच्या भोवतालचे अतिक्रमण

अक्कलकोट, दि.1 : अक्कलकोट नगरपालिकेच्यावतीने तारामाता उद्यानाच्या भोवतालचे सुमारे 102 खोकी अतिक्रमण विभागाच्या पथकाने काढली. या पथकात 1 जेसीबी, 2 ट्रॅक्टर, नगरपालिका आरोग्य विभागाचे 25 कर्मचारी, एसमएसईबीचे अधिकारी कर्मचारी, पोलिस बंदोबस्तामध्ये अतिक्रमण काढण्यात आली. बुधवार दि.2 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10 वा. पुन्हा सुरु होणार असल्याचे माहिती नगरपालिका बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.

शहराच्या मध्यवर्ती असलेल्या संस्थानकालीन तारामाता उद्यानात ऐतिहासिक व जगामध्ये अशा दोनचे फाऊंटन (कारंजे) असलेले प्रेक्षणीय कारंजा अतिक्रमणाने झाकाळून गेलेले होते. स्वामी समर्थांच्या समाधी मठाकडे जाणारे भाविक ऐतिहासिक कारंजाकडे पाहून व परिसरातील अतिक्रमण, उद्यानातील घाणीचे साम्राज्यामुळे नाराजी व्यक्त करीत होते. उद्यानाच्या सुशोभिकरणाच्या कामाबाबत अनेक सामाजिक संघटना, संस्थेच्यावतीने आंदोलन केलेले होते. नुकतेच उद्यान विकास कामास प्रारंभ करण्यात आला आहे. मंगळवारी तारामाता उद्यानाच्या भोवतालचे वृक्षरोड, खोके, अतिक्रमण नुकतेच हटविण्यात आले. यामुळे येथे उद्यान आहे, याची प्रथमच अनेक दिवसानंतर नागरिकांना जाणीव झाली. शहरातील अतिक्रमण मोहिम ही विविध भागात राबविणार की, एक दिवसात मोहिम ही गुंडाळली जाणार अशी चर्चा नागरिकांतून होत आहे.

याप्रसंगी मुख्याधिकारी सचिन पाटील, एमएसईबीचे अभियंता कुणाल माळवदे, मल्लय्या स्वामी, विठ्ठल तेली, विनायक येवले, प्रविण सावंत, नितीन पेटकर, नईम बागवान, सुभाष मडिखांबे, बालाजी पारखे, धनराज कांबळे, आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!