ध्यास विश्वसार्ह बातमीचा

नागणसुर मठाचे रेवणसिद्ध महास्वामीजीं लिंगैक्य,शुक्रवारी होणार अंत्यसंस्कार

 

तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट दि.१४ : नागणसुर (ता.अक्कलकोट ) येथील बसवलिंगेश्वर विरक्त मठाचे मठाधिपती म.नि.प्र रेवणसिद्ध महास्वामीजीं (वय – ७८ )यांचे वार्धक्याने गुरुवार दि.१४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता लिंगैक्य झाले.
पुराण, प्रवचनवर त्यांची अफाट श्रद्धा होती. त्या माध्यमातून मठाचे भव्य दिव्य असे देखणे बांधकाम त्यांनी केले होते. त्यासाठी गावकऱ्यांकडून एक पैसाही वर्गणी संकलन केले नव्हते. सतत ५८ वर्ष ते मठाचे मठाधिपती म्हणून कार्यरत राहिले. दरवर्षी पोळी तुपाचे जेवण देत सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करत असत.आतापर्यंत शेकडो जोडप्याचे विवाह करून दिले आहे. यासाठी कर्नाटक, महाराष्ट्रातुन लाखो भक्त हजेरी लावत असे. महाराष्‍ट्र कर्नाटक सीमावर्ती भागात त्यांचे मठ तुपाचे मठ म्हणून प्रसिद्ध होते.ते साधे, सरळ जीवन जगले. महागडे कार, गाडी, घोडा काहीच वापरले नाही. हे त्यांचे विशेष.त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे. त्यांचा अंत्यविधी शुक्रवार दि.१५ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!