सचिन पवार
अक्कलकोट, दि.१२ : अक्कलकोट
शहर व तालुक्यात आज वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला.या अवकाळी पावसाने सर्वांचीच तारांबळ उडाली. या पावसाने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे.शहर व परिसरातील अनेक गावांनी सायंकाळी ५ च्या वेळेस ढग येवून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊसाला सुरूवात झाली.
दुपारी ४ वाजल्यापासूनच ढगाळ वातावरणाची
निर्मिती झाली होती.पाऊस पडण्याचा
अंदाज होता.
त्यानुसार पाच वाजण्याच्या
सुमारास विजेचा कडकडाट आणि
ढगांच्या गडगडाटासह पाऊस पाहायला मिळाला.वागदरी भागात वादळी वाऱ्यासह
झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी
घरावरील पत्रे उडाले. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मराठवाडा ,मध्य महाराष्ट्र मध्ये हवामान कोरडा राहील असा अंदाज वर्तवला होता. परंतु अचानक पावसाने एन्ट्री केली.तालुक्याच्या अनेक भागात हा पाऊस पडल्याने फळबागांना देखील नुकसान पोहोचले आहे.यात प्रामुख्याने आंब्याला मोठा फटका बसलेला आहे. कडाक्याच्या उन्हामध्ये असा पाऊस पडल्याने उकड्यातून मुक्तता मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.