ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट तालुक्यात १४ पं.स गणाचे आरक्षण १३ जुलैला,कसे आहे नियोजन क्लिक करा आणि पहा !

 

अक्कलकोट, दि.६ : अक्कलकोट तालुक्यात होऊ घातलेल्या सात जिल्हा परिषद गट आणि चौदा पंचायत समिती गणाच्या आरक्षणाची सोडत येत्या १३ जुलैला होणार असल्याची माहिती तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी दिली.

अक्कलकोट येथील पंचायत समिती कार्यालयात सकाळी ११ वाजता पंचायत समिती गणाची आरक्षण सोडत निघणार आहे तसेच जिल्हा परिषद गटाची सोडत ही जिल्हा परिषद कार्यालयामध्ये निघणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.
या दिवशी चपळगाव, कुरनूर ,वागदरी, शिरवळ, दहिटणे, जेऊर, सुलेरजवळगे, मंगरूळ ,नागणसूर ,कडबगाव, सलगर, मुगळी ,तोळणुर, सिन्नुर या चौदा गणाचे आरक्षण जाहीर होणार आहे तर सोलापूरमध्ये चपळगाव,वागदरी,जेऊर, मंगरूळ, नागणसूर ,सलगर आणि तोळणुर
या सात गटांचे आरक्षण जाहीर होणार
आहे यावर्षी तोळणुर हा गट नव्याने अस्तित्वात आला आहे.त्यामुळे दोन गणांची संख्या देखील वाढली आहे.गण व गटाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर प्रारूप अधिसूचना १५ जुलैला प्रसिद्ध होईल.यानंतर या सोडतीवरील हरकती व सूचना १५ ते २१ जुलै पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करता येणार आहेत. आरक्षण सोडतीचा अहवाल तसेच सोडतीवर प्राप्त झालेल्या हरकती व सूचना अभिप्रायासह राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्याची मुदत २५ जुलै असून या सर्व प्रक्रियेला २९ जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोग मान्यता देईल. त्यानंतर अंतिम आरक्षणाची प्रसिद्धी २ ऑगस्ट रोजी केली जाणार आहे, असेही सिरसट यांनी सांगितले. त्याबाबतचे नियोजन सध्या तहसील कार्यालयात सुरू आहे.

मतदार संघातील
उत्सुकता शिगेला

नगरपालिका नगरसेवकपदाचे आरक्षण
जाहीर झाल्यानंतर तालुक्यातील जिल्हा परिषद मतदार संघामधील नागरिकांचे लक्ष हे या निवडणुकीच्या आरक्षणाकडे लागले होते. अखेर निवडणूक आयोगाने बुधवारी तारीख जाहीर केल्याने उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे.आता या मतदारसंघांमध्ये आरक्षण कोणते निघणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!