---Advertisement---

अक्कलकोटच्या विठ्ठल मंदिरात रंगणार विठ्ठल भक्तीचा सोहळा; आषाढी एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.६ : अक्कलकोट येथील
श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित ए.वन चौक परिसरात असलेल्या दिडशे वर्षापुर्वीच्या हेमाड पंथीय श्री उपलप विठ्ठल मंदिरात सालाबादाप्रमाणे यंदाही आषाढी एकादशी रविवार दि. १० जुलै रोजी साजरी करण्यात येणार आहे. यामुळे दोन वर्षानंतर अक्कलकोट विठ्ठल मंदिरात आषाढीनिमित्त एका प्रकारे विठ्ठल भक्तीचा सोहळाच रंगणार आहे. या आषाढी एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले असल्याची माहिती वटवृक्ष मंदिर समितीचे व उपलप विठ्ठल मंदिर व्यवस्थापन समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली. यानिमित्त आषाढी एकादशी निमित्त मंदीरातील विठ्ठल रुक्मिणी देवतांस वटवृक्ष देवस्थानकडून चेअरमन इंगळे व विठ्ठल मंदिर व्यवस्थापन समितीचे सदस्य आरती उपलप यांच्या हस्ते पहाटे ५ वाजता महाअभिषेक (महापुजा) होईल. यानंतर विठ्ठल मंदीर पटांगणात सकाळी ७ ते ९ या वेळेत मराठवाडयातील श्री.विठ्ठल भजनी मंडळ (चिकूर्डा, जि.लातूर), व अजानूबाहू वारकरी शिक्षण संस्था (बेंबळी,उस्मानाबाद) यांची भजनसेवा होईल. तदनंतर सकाळी ९ ते ११ या वेळेत आळंदी येथील ह.भ.प.कृष्णा महाराज काकडे यांची कीर्तन सेवा सादर होईल. या एकादशी निमित्त संपूर्ण विठ्ठल मंदिरास विद्युत रोषणाई करून सजविले जाणार आहे. कार्यक्रमाकरीता आकर्षक असा मंडप शामियाना उभारण्यात येणार आहे. एकादशी निमित्त येणाऱ्या वारकरी भाविकांना श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने उपवासाचे शाबूू खिचडी, केळी प्रसाद, चहा, कॉफी इत्यादी फराळ प्रसादांचे वाटप करण्यात येणार आहे. तरी भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा, भजन,कीर्तन सेवेचा व फराळ प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!