ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जडेय शांतलिंगेश्वर स्वामीजींचा गुरुवंदना समारंभ भक्तीभावाने, सुवासिनींच्या जलकुंभ यात्रेने वेधले कार्यक्रमाचे लक्ष

अक्कलकोट,दि.२५ : निंबाळ मठाचे परमपूज्य मौनतपस्वी श्रीगुरु जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या
८० व्या वाढदिवसानिमित्त शहरातील मुख्य मार्गावरून भव्य शोभा यात्रा काढण्यात आली.या कार्यक्रमान शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.यादरम्यान हजारो भाविकांनी महास्वामीजींचे दर्शन घेत कार्यक्रमाला हजेरी लावली.यानिमित्त हजारो
भाविकांच्या उपस्थितीत गुरुवंदना व तुलाभार कार्यक्रम मोठ्या
उत्साहात पार पडला.या कार्यक्रमासाठी आंध्रप्रदेश,कर्नाटक,महाराष्ट्र राज्यातून मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते. प्रियदर्शनी मंगल कार्यालय येथे
गुरुवंदना सेवा समितीच्यावतीने हा कार्यक्रम घेण्यात आला.दरम्यान शहरातून निघालेली सुवासिनींची
शिस्तबद्ध जलकुंभयात्रा लक्षवेधी ठरली.जलकुंभ संयोजनासाठी
सुवर्णा साखरे,मल्लम्मा पसारे,स्नेहा माळशेट्टी,तारकेश्वरी उन्नद,रेखा माशाळे,सुनीता हडलगी,मेघा हिंडोळे, स्मिता मसुती,संध्या हिप्परगी,अरुणा स्वामी, सावित्री गोरे,निलम्मा माशाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत म.नि.प्र.बसवलिंग महास्वामीजी (अक्कलकोट) यांनी केले.

 

यावेळी श्री.ष. ब्र. जय गुरुशांत लिंगाराध्य शिवाचार्य,श्री.ष.ब्र.संगमेश्वर शिवाचार्य,श्री म. नि. प्र.सदाशिव महास्वामीजी,श्री.म. नि. प्र.अभिनव शिवलिंग महास्वामीजी,श्री.ष. ब्र.घनबसव अमरेश्वर महास्वामीजी,श्री.म. नि. प्र अभिनव बसवलिंग महास्वामीजी यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाला माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे,प्रथमेश म्हेत्रे,
शीतल म्हेत्रे,मल्लिकार्जुन पाटील,आनंद तानवडे,नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी,बाळासाहेब मोरे,महेश हिंडोळे,कांतू धनशेट्टी आदिंसह मान्यवरांनी हजेरी लावली.गुरुवंदना
सेवा समितीतर्फे दत्तकुमार साखरे,शिवलिंग स्वामी, बसवराज
माशाळे,प्रमोद लोकापुरे,राजकुमार उमराणीकर,शिवकुमार कापसे,अप्पू पराणे,बाळकृष्ण म्हेत्रे, चेतन साखरे,शिवानंद
बिंदगे, विजयकुमार बिराजदार, राजू एकबोटे,ओंकार लोकपूरे, शशिकांत लिंबीतोटे,सुरेश पाटील,नीलकंठ कापसे,अविनाश मंगरुळे,राजू कलबुर्गी,दयानंद बिडवे,डॉ.सुनील बिराजदार, राजू मलंग आदींनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!