अक्कलकोट,दि.५ : अक्कलकोट तालुक्यात खडी क्रशर मशीनचे नूतनीकरण नसल्याने व शासनाच्या निकषाप्रमाणे काही कागदपत्रात त्रुटी असल्याने पाच खडी क्रशर मशीन सील करण्यात आल्या आहेत.परिणामी त्या सध्या बंद आहेत,अशी तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी दिली आहे.यामुळे खडी क्रशर चालकांमध्ये मोठी खळबळ
उडाली आहे.दरम्यान या पाचही खडी क्रशर मशीनचे वीज कनेक्शन बंद करण्याबाबत महावितरणला पत्र देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.यानंतर महावितरणचे अधिकारी संजीवकुमार म्हेत्रे यांनी वीज कनेक्शन
बंदची कारवाई केली आहे.यात अक्कलकोट शहरातील चार तर मैंदर्गी येथील एका खडी क्रशर प्लांटचाही समावेश आहे.काही दिवसांपूर्वी आरपीआयचे तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे यांनी देखील खडी क्रशर मशीन संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार केली होती.याची दखल वरिष्ठ पातळीवरून घेण्यात
आल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.मुदत संपूनही खडी क्रशर मशीन सुरू राहिल्याने प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.