अक्कलकोट, दि.२४ : अक्कलकोट विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांची पिंपरी चिंचवड येथे बदली करण्यात आली आहे. गौर यांची बदली पदोन्नतीने बदली झाली असून त्यांची नियुक्ती सहायक पोलीस आयुक्त म्हणून करण्यात आली आहे.गौर हे अंत्यत कडक शिस्तीचे होते अक्कलकोटला त्यांनी जेमतेम दीड वर्षांच्या कालावधीत सेवा बजावली परंतु या काळात अक्कलकोट तसेच वळसंग या पोलीस ठाण्याच्या हद्दीत चांगली सेवा बजावली. अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी मंदिर समिती तसेच अन्नछत्र मंडळ यांच्या मार्फत योग्य नियोजन करण्यात यावे यासाठी राजेंद्रसिंह गौर नेहमी तत्पर राहिले.भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांनी मंदिर समिती अन्न छत्र मंडळ अक्कलकोट नगरपरिषद आणि तहसीलदार यांच्या समवेत वारंवार नियोजन बैठका घेऊन उपाययोजना करण्यासाठी भाग पाडले.इतकेच नाही तर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी त्यांनी अंबुलन्स व वैद्यकीय सेवा तैनात करण्याची शक्ती मंदिर समिती व अन्नछञ मंडळाला केली आणि याचे चांगले परिणाम दिसून आले दर्शन रांगेत पिण्याचे पाणी वृद्ध व्यक्तींसाठी सावली व बसण्यासाठी निवारा या गोष्टींची ही त्यांनी सक्ती केली आणि ते लागू केले.आपल्या कार्यकाळात त्यांनी गुड पोलीसिंग देण्याचा प्रयत्न केला.त्याशिवाय अक्कलकोट नगरपरिषद तहसीलदार कार्यालय पंचायत समिती या कार्यालयांना जनतेसाठी आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविण्यासाठी त्यांनी वेळोवेळी सूचना देऊन अक्कलकोट वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कायदा व सुव्यवस्था उत्तम ठेवण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले यामुळे त्यांच्या कार्यकाळात अक्कलकोट उप विभागात गेल्या दोन वर्षाच्या काळात शांतता टिकून राहिली
आणि सामाजिक सलोखा टिकून राहिला.याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.