अक्कलकोट, दि.१८ : मुंबई,पुण्याच्या
धर्तीवर भाविकांची गरज लक्षात घेऊन अक्कलकोट मध्ये श्री स्वामी समर्थ मंदिराजवळ तब्बल १ कोटी ३० लाख रुपये खर्च करून भव्य दिव्य असे दोन मजली सुलभ शौचालय व स्नानगृह उभे करण्यात आले आहे त्याचा लोकार्पण सोहळा श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले व माजी नगरसेवक उत्तम गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.यामुळे हजारो स्वामी भक्तांची सोय होणार आहे.गेल्या अनेक वर्षांपासून स्वामी भक्तांची अशा प्रकारची व्यवस्था करण्याची मागणी होती परंतु हे काम होत नव्हते.प्रभाग ७ च्या नगरसेविका सुवर्णा गायकवाड यांच्या प्रयत्नातून व माजी नगराध्यक्ष शोभा खेडगी तसेच तत्कालीन मुख्याधिकारी आशा राऊत यांच्या सहकार्याने या कामाला अखेर मंजुरी मिळाली.निर्मिती व व्यवस्था मे.सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्व्हिस ऑर्गयझेशन महाराष्ट्र अंतर्गत बीओटी तत्वावर अक्कलकोट नगरपालिकेच्या सौजन्याने हे काम अखेर पूर्ण झाले आहे.महिला व पुरुष या दोघांसाठी स्वतंत्र २० स्नान गृह आणि २० सुलभ शौचालय आहेत.अक्कलकोटमध्ये स्थानिक रहिवाशी आणि दर्शनासाठी येणाऱ्या भाविक या दोघांसाठी सोय झाली आहे. साधारण३० हजार स्क्वेअर फुट जागेमध्ये ही भव्य दिव्य इमारत उभी करण्यात आली आहे.स्वामी
समर्थ मंदिरापासून अगदी हाकेच्या अंतरावर सुलभ शौचालय कार्यान्वित झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.यासाठीचा करार त्या कंपनीबरोबर ३० वर्ष आहे.यावेळी बोलताना माजी नगरसेवक उत्तम गायकवाड म्हणाले की,यासाठी भाविकांची प्रचंड गैरसोय होत होती मोठ्या शहरांमध्ये असे शौचालय होते तसेच शौचालय आणि स्नानगृह आपल्या अक्कलकोट शहरामध्ये देखील असावे असे वाटत होते आणि याला प्रशासनाची मोठी साथ मिळाली म्हणून हे शक्य झाले ते कालपासून सुरू झाले आहे.याचा लाभ भाविकांनी घ्यावा.यावेळी मैनोदीन कोरबू लक्ष्मण जहागीरदार,गोटू मलवे,पिंटू मीनगले ,तुषार गायकवाड,संदीप गायकवाड, सागर सुतार, शेखर गायकवाड,स्वप्नील गायकवाड, स्वामी गायकवाड, सतीश सुतार, प्रदीप सर्जन,
अमित शिंदे, प्रदीप सोनकांबळे,गणेश मडीखांबे, रोहित वाघमारे,भीम मडिखांबे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.