ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पारदर्शकता ,प्रामाणिकपणा व परिणामकारकतेवर भर देणार;प्रशांत अरबाळे अक्कलकोटचे नवे गटशिक्षणाधिकारी

अक्कलकोट, दि.११ : गटशिक्षणाधिकारी कुदसिया शेख सेवानिवृत्त झाल्यानंतर नूतन गटशिक्षणाधिकारी म्हणून प्रशांत अरबाळे यांनी मंगळवारी पदभार घेतला. पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि परिणामकारकता या तीन मुद्द्यावर आपण काम करणार असून शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर आपला भर राहील,असे अरबाळे यांनी
यावेळी बोलताना सांगितले.शेख सेवानिवृत्त झाल्यानंतर पुढचे शिक्षणाधिकारी कोण यावर मागच्या आठवडाभरापासून जोरदार चर्चा होती. त्यासाठी तालुक्यात चार विस्तार अधिकारी होते. त्यांनीही जोरदार फिल्डिंग लावली होती. या चार जणांमधील स्पर्धा पाहून जिल्ह्याच्या एका अधिकाऱ्याची वर्णी या ठिकाणी लावण्यात आल्याची चर्चाही शिक्षण क्षेत्राच्या वर्तुळात होती.मागचे दोन दिवस यात गेले मात्र अखेर अरबाळे यांची नियुक्ती झाल्याने या वादावर पडदा पडला आहे. गेल्या दीड वर्षापासून तालुक्यात शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून ते काम करत आहेत त्यांचे काम चांगले आहे एक कडक शिस्तीचे अभ्यासू, प्रामाणिक अधिकारी म्हणून
त्यांचा नावलौकिक आहे याचा विचार करून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील अरबाळे यांच्याकडे गटशिक्षणाधिकारीपदाचा भार सोपविला आहे.अरबाळे हे यापूर्वी आदिवासी आश्रम शाळा किनवट (जि. नांदेड) येथे २००५ ते २००६ साली मुख्याध्यापक म्हणून सेवा केली आहे.त्यानंतर जिल्हा परिषद सातारा ( पाटण ) येथे २०१३ ते २०२२ पर्यंत विस्तार अधिकारी म्हणून काम केले त्यानंतर अक्कलकोट येथे विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत होते. पदभार घेतल्यानंतर विविध संस्था, शिक्षक संघटना यांच्यातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

 

आकांक्षीत योजनेतून शिक्षण
विभागाला बाहेर काढू

अक्कलकोट तालुक्यात
२५७ जिल्हा परिषद शाळा आहेत. यात कन्नड,मराठी, उर्दू तिन्ही माध्यमाची शाळा आहेत या शाळांची गुणवत्ता वाढविणे, शिक्षकांना शिस्त लावणे यासह अन्य बाबींवर आपण फोकस करणार आहे. मुख्य म्हणजे आकांक्षीत योजनेतून शिक्षण विभागाला बाहेर काढून दर्जा वाढविण्यावर आपला भर राहील.

प्रशांत अरबाळे,गटशिक्षणाधिकारी

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!