अक्कलकोटमध्ये माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या एकसष्टीची जय्यत तयारी,गौरव समितीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन पाटील
अक्कलकोट ,दि.२० : माजी मंत्री सिद्धाराम
म्हेत्रे यांच्या एकसष्टी निमित्त येत्या ८ एप्रिल
रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्याची जय्यत तयारी सध्या अक्कलकोटमध्ये सुरू आहे.यानिमित्त गौरव समितीची स्थापना करण्यात आली
असून त्याच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन पाटील यांची तर स्वागताध्यक्षपदी सुरेश हसापुरे तर उपाध्यक्षपदी अरुण जाधव यांची निवड करण्यात आली आहे.या पार्श्वभूमीवर प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक अक्कलकोट येथील सिद्धाराम-शंकर प्रतिष्ठान पोलीस प्रशिक्षण केंद्रात पार पडली.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे हे होते.व्यासपीठावर नगरसेवक अशपाक बळोरगी,दुधनी बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे, हरीश पाटील,श्रीशैल नरोळे, पंडित सातपुते, संजय
इंगळे,सातलिंग शटगार उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष जाधव यांनी केले.या
नियोजन बैठकीत व्यंकट मोरे, मल्लिकार्जुन पाटील, सुरेश हसापुरे, अशपाक बळोरगी,शंकर म्हेत्रे यांनी मार्गदर्शन केले.८ एप्रिल रोजी सिद्धाराम म्हेत्रे यांचा वाढदिवस असून त्यांच्या या कार्यक्रमासाठी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे,महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,मंत्री अशोक चव्हाण,छगन भुजबळ, सतेज पाटील ,काँग्रेसचे जेष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे,असलम शेख , काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,पालकमंत्री दत्ता भरणे,डी.के.शिवकुमार, आमदार प्रणिती शिंदे आदींसह प्रमुख नेते मंडळीना निमंत्रण देण्यात आले असून त्यांच्या स्वागताची तयारी सुरू झाली आहे.अक्कलकोट येथील टिनवाला फंक्शन हॉलच्या मैदानात हा कार्यक्रम होणार आहे.या निमित्ताने पार पडलेल्या बैठकीत वेगवेगळया समित्या गठीत करून प्रमुख नेत्यांवर कार्यक्रमाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.या कार्यक्रमास २० ते २५ हजार कार्यकर्ते उपस्थित राहतील,असा अंदाज आहे.यावेळी शिवराज स्वामी, धनेश अचलेरे, शाकीर पटेल यांनी सूचना मांडली.या कार्यक्रमात विलास गव्हाणे, महेश जानकर, जहांगीर शेख, प्रवीण शटगार, सातलिंग गुंडरगी, रामचंद्र अरवत, सुभाष पाटोळे, सुनील गोरे, असद पिरजादे, काशिनाथ कुंभार, जाकीर पटेल, सिद्धू भंडारकवठे, सिद्धार्थ गायकवाड, मुजीब नदाफ, रवि वरनाळे, राजू निरोळी, शिवयोगी लाळसंगी,शबाब शेख, काशिनाथ गोळ्ळे, सद्दाम शेरिकर, सुनील खवळे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.