अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याकडून अवैध व्यवसायावर १२ गुन्हे दाखल;३२४ लिटर दारू, ७१०० लिटर गुळमिश्रित रसायन नष्ट, २५ कुटुंबीयांना समुपदेशनाने मत परिवर्तन !
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट : पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या संकल्पनेतून दि ४ सप्टेंबर पासुन ऑपरेशन परिवर्तन राबविण्यात येत आहे.या मोहिमे अंतर्गत जिल्हयात अवैद्य हातभट्टी निर्मीती, वाहतूक, वितरण, विक्री याचे ७१ हॉटस्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. हे प्रत्येक हॉटस्पॉट गाव एका अधिका-यास दत्तक दिले असून या अधिका-याने वारंवार या गावास भेट देणे, अवैद्य हातभट्टी निर्मीती, वाहतूक, वितरण, विकी यांचेवर कायदेशिर कठोर कारवाई करणे तसेच या व्यवसायात लिप्त नागरिकांचे समुपदेशन करून त्यांना मार्गदर्शन करणे व हा अवैद्य व्यवसाय सोडण्याविषयी त्यांचे
मतपरिवर्तन करणे हे उदिष्ठ निर्धारीत करण्यात आले आहे. या कारवाई सोबतच पर्यायी रोजगारा विषयी मार्गदर्शन सुध्दा करण्यात येत आहे. पशुपालन ,दुग्धव्यवसाय, शेती, किराणा, अन्य पुरक व्यवसाय या विषयी सुध्दा मार्गदर्शन करण्यात येत आहे.
गटविकास अधिकारी,तहसिलदार, राज्य उत्पादन शुल्क, वनविभाग, महावितरण यांनासुध्दा या मोहिमे मध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे. अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे हद्दीत अक्कलकोट शहर पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, ब-हाणपूर सपोनि. महेश भाविकट्टी, किणीमोडतांडा, पोलीस उपनिरीक्षक, मोतीराम मोरे, वागदरी परि.पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी याप्रमाणे हॉटस्पॉट व त्यासाठीचे दत्तक अधिकारी म्हणून नियुक्ती केले आहेत. या अधिका-यांनी मागील १५ दिवसात ४ वेळा त्यांचे
दत्तक गावांना भेट दिली असून अवैद्य हातभट्टी निर्मीती, विकी याबाबत एकुण १२ गुन्हे दाखल केले असून या कारवाई दरम्यान ३२४ लिटर दारू व ७१०० लिटर गुळमिश्रीत रसायण जप्त करून नष्ट केले आहे. या चारही गावातील सुमारे २५ कुटुंबीयांना समुपदेशन करून अन्य
व्यवसाय करणे बाबत मार्गदर्शन केले आहे. या कारवाईमुळे या अवैद्य व्यवसायात सहभागी लोकांचे मतपरिवर्तन होऊ लागले असून सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला आहे. सुमारे ८० टक्के लोकांनी हा व्यवसाय बंद केला असून या अभिनव उपक्रमास प्रतिसाद मिळत आहे.पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, सपोनि.भाविकट्टी, देवेंद्र राठोड, पोलीस उपनिरीक्षक, मोतीराम मोरे, परि.पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी, पोहेकॉ/अंगद गिते,विपीन सुरवसे, प्रवीण वाळके, गोडसे, राजू फुलारी, पिरजादे, पोना/अजिंक्य बिराजदार, असीफ शेख, रमजान पाटील, धनराज शिंदे, पोकॉ अन्सारी,अशपाक मियांवाले,चिदानंद उपाध्ये, प्रमोद शिंपाळे, गजानन गायकवाड, अंकुश राठोड, सिताराम राऊत, राम चौधरी, नामदेव माने,आकाश कलशेट्टी, प्रशांत कोळी, अनिल चव्हाण, अंबादास दुधभाते, भैरवनाथ बहीरगुंडे, बशीर शेख, काळे, महेश कुंभार, संतोष वाघमारे, आवताडे, स्वामी, चव्हाण, बिराजदार,गजानन शिंदे, मपोकॉ/शारदा हिप्परगी, रेखा नैताम, सगुमळे, हे ऑपरेशन परिवर्तन राबवत असून हातभट्टीचे समुळ उच्चाटन होईपर्यंत हे अभियान सुरू राहणार आहे असे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.