---Advertisement---

अक्कलकोटमध्ये बाजारसाठी आलेल्या महिलेच्या पैशावर चोरट्याचा डल्ला

Follow Us:
---Advertisement---

 

तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट : अक्कलकोट शहरातील फत्तेसिंग चौक ते तूप चौक असे पायी चालत जाणाऱ्या महिलेच्या प्लस्टिक पिशवीतील अज्ञात चोरट्यांनी १२ हजार रुपये लंपास केले आहे. ही घटना दि २० रोजी दुपारी अक्कलकोट शहरात घडली.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की कमलाबाई महांतय्या स्वामी व त्यांची जाऊ महानंदा स्वामी रा बसलेगाव ता अक्कलकोट या दोघी आठवडा बाजारसाठी टमटमने अक्कलकोटला आल्या व त्यानंतर त्या फत्तेसिंग चौक ते तूप चौक असे पायी चालत जात असताना त्यांच्याजवळील पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीमध्ये ठेवलेले १२ हजार रुपयांवर अज्ञात चोरटय़ांनी डल्ला मारला. याबाबत फिर्यादी कमलाबाई महांतय्या स्वामी यांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार राजेंद्र फुलारी करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!