ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट रोटरीच्या अध्यक्षपदी दिनेश पटेल तर सचिवपदी अप्पासाहेब पाटील निवड, शनिवारी होणार पद्ग्रहण सोहळा

अक्कलकोट, दि.७ : २०२१ -२२ या
वर्षीच्या अक्कलकोट रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी दिनेश पटेल यांची तर सचिवपदी अप्पासाहेब पाटील यांची निवड करण्यात आली आहे.पदग्रहण सोहळा सोलापूर रोडवरील डी ग्रीन व्हीलेज रिसॉर्ट येथे शनिवार,दि.१० जुलै रोजी सकाळी १० वाजता पार पडणार आहे,अशी माहिती देण्यात आली.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी प्रांतपाल सी.ए.व्यंकटेश चन्ना तर पदग्रहण अधिकारी म्हणून उपप्रांतपाल कालिदास मानेकरी यांची उपस्थिती राहणार आहे.

यावेळी प्रकाश घिवारे,  नितीन पाटील,सिध्दाराम उडचाण,वैजनाथ तालीकोटी, मावळते अध्यक्ष जितेंद्र जाजु,निनाद शहा निरंजन शहा, शैलेश जाधव, अनिल तोतला, एजाज मुतवल्ली, विलास कोरे, महेश जवळगी, डॉ.प्रकाश वाली, शशिकांत लिंबीतोटे, संजीव नंदर्गी, ओंकारेश्वर उटगे, अ‍ॅड.सुनिल बोराळकर, आनंद गंदगे, सिध्दाराम मसुती, अशोक येणगुरे, निखिल मेहता, डॉ.विपुल शहा, मनोज काटगाव, चंदन आडवितोटे, योगीराज गंभीरे, सतिश शिंदे, सचिन किरनळ्ळी, बसवराज आडवितोटे आदी रोटरीयन्स संचालक म्हणून पदभार स्विकारणार आहेत.तरी या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन नूतन
अध्यक्ष दिनेश पटेल यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!