प्रतिनिधी
कुरनूर दि.२४ : शालेय शिक्षण क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्यवतीने आयोजित कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत श्रीमती धोंडूबाई स्वामी प्रशाला, चुंगीचा विद्यार्थी तेजस गणपत काजळे,१४ वर्ष वयोगटात ४.९० मिटर लांब उडी स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळावीला. पुणे विभागीय स्तरावर निवड झाल्याबद्दल क्रीडा शिक्षक रमेश सोनकर, राजकुमार काळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थी तेजस काजळे यांचे श्री फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजीव माने ,उपाध्यक्ष प्रल्हाद जाधव , बाळासाहेब मोरे व सर्व संचालक, शालेय समितीचे अध्यक्ष तानाजी चव्हाण, महादेव माने, दिलीप काजळे प्रशालेचे मुख्याध्यापक किरण गायकवाड,सचिन निंबाळकर, सचिन काटे, दिपक पडवळकर, संभाजी गायकवाड, राजेभाई शेख,प्रतिभा कापसे, वासंती मोरे, नागय्या स्वामी शिवाजी काजळे, जावेद मणियार, महादेव काजळे आदींनी क्रीडा शिक्षक व तेजसचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.