अक्कलकोट, दि.१ : अक्कलकोट तालुक्यातील हिळळी ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंचपदी अप्पाशा शटगार यांची तर उपसरपंचपदी सलीम मुजावर यांची निवड करण्यात आली. सरपंच निवडीनंतर एकच जल्लोष करण्यात आला. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मुजावर-शटगार – बाके – पुजारी या ग्रामविकास पॅनलने बाजी मारली होती.
नूतन सरपंच अप्पाशा शटगार हे उच्चशिक्षित असून स्टेट बँकेचे निवृत्त अधिकारी आहेत.ते एक कार्यक्षम शिस्तप्रिय अधिकारी म्हणून सुपरिचित आहेत.त्यांच्या हाती गावकऱ्यांनी सत्ता सुपूर्द केली आहे.निवडीनंतर बोलताना शटगार म्हणाले की,हिळळी गावच्या चौफेर विकासासाठी चाणाक्ष मतदारने मला संधी दिलेली आहे. पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण, खराब रस्ते शौचालय, वीज, स्मशानभूमी याची समस्या गावात असून ती दूर करून गावचा विकास साधणे हेच आपले ध्येय असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बाळशंकर, ग्रामसेवक पुजारी व तलाठी चव्हाण यांनी काम पाहिले. यावेळी पॅनल प्रमुख अश्पाक मुजावर, महंमदहनीफ मुजावर, शिवानंद बाके, भीमण्णा शटगार,कामणा बरगाले, संजय पुजारी, दत्तात्रय हिळळी, दिलीप शिवशरण, ईलाई मुजावर, वीरभद्र यादवाड आदी उपस्थित होते.यावेळी नूतन ग्रामपंचायत सदस्य अशपाक मुजावर, सुरेखा वि. यादवाड ,वसुंधरा शिवशरण, रुकसाना मुजावर तसेच सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला.