अक्कलकोट, दि.५ : राज्य सरकारने लागू केलेल्या कडक निर्बंधामुळे निबंध माला अक्कलकोटमधील व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.याबाबत व्यापाऱ्यांची
तातडीची बैठक घेण्यात आली.
गेल्या २१ मार्च पासून लाॅकडॉउनमध्ये आर्थिक स्थिती ढासळलेली आहे.
पुन्हा पुन्हा लॉक डाउन केल्यास संपूर्ण व्यापारी वर्ग हतबल होतील. आता गुढी पाडवा असल्याकारणाने नवीन वस्तू विक्री होईल, ह्या हेतूने भरपूर खर्च करून, बँक कर्ज घेऊन भरपूर माल भरून ठेवलेला आहे.त्याकरिता आम्ही सर्व छोठे मोठे व्यापारी बंधू स्वयंस्फूर्तीने शनिवार रविवार बंद करून शासनास सहकार्य करू, सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत चालू ठेवण्यासाठी परवानगी मिळावी नाही तर आम्ही सर्व व्यापारी बंधु मिळून शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन उभारण्यात येईल,असा इशारा बैठकीत देण्यात आला.
अक्कलकोट व्यापारी महासंघाची बैठक व्यापारी महासंघाच्या कार्यालयांमध्ये संपन्न झाली.या बैठकीसाठी अध्यक्ष मल्लिनाथ साखरे, उपाध्यक्ष प्रसन्न हत्ते,नितीन पाटील,निनाद शहा,दिनेश पटेल, गजानन पाटील ,इब्राहिम कारंजे,अरुण नरेगल, विजय कुलकर्ण, राजशेखर हिप्परगी,राजू लोखंडे, हन्नालाल मुल्ला आदी व्यापारी बांधव उपस्थित होते.