अक्कलकोट ट्रामा केअर प्रकरणी आरोग्य मंत्र्यांनी घातले लक्ष;शिंदे गटाचे तालुका प्रमुख देशमुख यांचा पाठपुरावा
अक्कलकोट, दि.२६ : गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या ट्रामा केअर सेंटर बद्दल आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी लक्ष घातले असून यावर संबंधितांना ट्रामा केअर सेंटर त्वरित सुरू करण्याचे आदेश दिले
आहेत. याबाबत त्यांनी आरोग्य उपसंचालकांशी चर्चा केल्याने हा प्रश्न मार्गी लागला आहे. शिंदे गटाचे तालुकाप्रमुख संजय देशमुख यांनी ही मागणी केली होती. त्यावर आरोग्य मंत्र्यांनी तात्काळ पावले उचलली आहेत. येत्या आठवड्यात काम पूर्ण करुन चालु करणेसाठी तात्काळ कार्यवाही करावी असा आदेश त्यांनी दिले आहेत.
रविवारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करमाळा येथील कार्यक्रमाला जाण्यासाठी सोलापूर विमानतळावर येणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी सावंत उपस्थित होते. त्यावेळी देशमुख यांनी त्यांची भेट घेऊन अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात असलेल्या ट्रामा केअर सेंटर तात्काळ सुरु करणेकामी चर्चा केली.यावेळी त्यांनी तात्काळ राज्याचे आरोग्य उपसंचालक यांना भ्रमणध्वनीच्या माध्यमातून ट्रामा केअर सेंटरच्या सध्यस्थितीबाबत माहिती जाणूून घेवून ते सुरु करणेकामी ज्या काही अडचणी आहेत, त्या त्वरीत सोडवून ट्रामा केअर सेंटरची सुविधा सुरु करावी. याकरिता आरोग्यमंत्री म्हणून लागणारी मदत त्वरीत उपलब्ध करुन देण्याची ग्वाही सावंत यांनी दिली.
यावेळी जिल्हा प्रमुख मनिष काळजे, सोलापूर शहर प्रमुख मनोज शेजवाल, संदीप देशमुख, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अशोक राठोड, बसवराज बिराजदार, विनोद मदने आदी उपस्थित होते.