दुधनी : दुधनीचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्वर महाराज यांच्या यात्रेतील अतिशय महत्त्वाचा विधी असलेला अक्षता सोहळा शनिवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास दुधनी विरक्त मठाचे मठाधिपती डॉ. शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या अध्यक्षतेखाली भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी यात्रेचे मानकरी यावेळी यात्रेचे मानकरी इरय्या पुराणिक, चन्नविर पुराणिक, सुगेश बाहेरमठ, महेश बाहेरमठ, शांतलिंग बाहेरमठ यांनी वेदोक्त पद्धतीने मंत्रोच्चार केला. कोरोना महामारी मुळे सलग दोन वर्षे भक्तांच्या अनुपस्थितीत झालेल्या अक्षता सोहळ्याला यंदा हजारो भक्तांची मांदियाळी होती.
प्रारंभी अक्षतेचे मानकरी ईरय्या पुराणिक यांच्या घरात पोथी-पुराण ग्रंथाची पुजा करण्यात आले. त्यानंतर सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीच्या सदस्यांच्या उपस्थितीत मल्लिकार्जुन मंदिरात महाआरती करण्यात आले. महाआरती नंतर पोथी-पुराण, मानाचे पाच नंदीध्वज, ढोल-ताशा, बॅन्ड पथकासह लक्ष्मी रोड, हौदे गल्ली, कुंभार गल्ली, विरक्तमठ चौक मार्गे हर्र बोला हर्र.. श्री सिध्देश्वर महाराज की जय.. श्रीशैल मल्लिकार्जुन महाराज की जय, शांतलिंगेश्वर महाराज की जय च्या जयघोष करत सिद्धेश्वर मंदिराकडे मार्गस्थ झाले.
मिरावणुकीच्या मार्गात सुहासिनिनी नंदीध्वजांना बाशिंग बांधून फूल, तिळगूळ वाहून नैवेद्य दाखवून नंदीध्वजांच दर्शन घेतला. शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या योगदंडाचे प्रतीक असलेल्या मानाच्या पाच नंदीध्वज व श्रीची मूर्ती संमती कट्ट्याजवळ दुपारी सव्वा एक वाजता दाखल झाल्या. त्यानंतर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत येगदी, दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे, शिवानंद माड्याळ यांच्या उपस्थितीत, देवस्थान पंच कमिटीचे सदस्य गिरमल्लप्पा सावळगी, सातलिंग परमशेट्टी, सिद्धाराम येगदी, प्रभुलिंग पाटील, सिद्धाराम मल्लाड यांच्या हस्ते सुगडी पूजन करण्यात आले. त्यानंतर अक्षता सोहळ्याचे मानकरी ईरय्या पुराणिक आणि चन्नविर पुराणिक सम्मती वाचनास सुरुवात केली.
यावेळी लक्ष्मीपुत्र पाटील, मल्लिनाथ म्हेत्रे, मलकाजप्पा अल्लापुर, शिवशरणप्पा हबशी, चंद्रकांत बबलाद, शिवानंद हौदे, बसण्णा धल्लू, शरणप्पा मगी, बसवराज शांतप्पा हौदे, गुरूशांत ढंगे, बाबा टक्कळकी, लक्ष्मीपुत्र हबशी, संतोष जोगदे, मल्लिनाथ येगदी, अतुल मेळकुंदे, प्रशांत लोणी, अंबण्णा निंबाळ, विश्वनाथ गंगावती, शांतलिंग गुडोडगी, नंदू संगोळगी, शिवानंद फुलारी, बसवराज हौदे, हणमंत कलशेट्टी, श्रीशैल माशाळ, दौलत हौदे, लक्ष्मीपुत्र भाईकट्टी, उमेश सावळसूर, अभिषेक पादी, सातलिंग अंदेनी, गुरुशांत वडेयर, महेश घुळनुर यांच्यासह दुधनी आणि पंचक्रोशीतील भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
अक्षता सोहळा दरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश स्वामी, पोलीसउप निरीक्षक रेवणसिद्ध काळे, हवालदार अजय भोसले, पोलीस नाईक नाबिलाल मियावाले, सुरेश लामजने, कॉन्स्टेबल सचिन गायकवाड, राजू खंडाळ यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.