सोलापूर : वृत्तसंस्था
काँग्रेसच्या सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी लाडकी बहिण योजनेवरून शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. लाडक्या बहिणींना विकत घेणार का? असा थेट सवाल प्रणिती यांनी केला आहे. गुजरातमधील कांद्याची निर्यात होते. मात्र महाराष्ट्रातील केली नाही. सिंचनाची पाणीपट्टी दहा टक्क्याने वाढवली आहे त्याचा निषेध करते. नितीन गडकरी काल म्हणाले अनुदान मिळणार नाही, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.
पुढे बोलतांना शिंदे म्हणाल्या, सरकारचे सगळे पैसे लाडक्या बहिणीसाठी वापरले आहेत. कोणत्याही बहिणीला अनुदान मिळणार नाही. येणाऱ्या दोन महिन्यात सर्व योजना बंद होतील. केवळ तीन योजना चालू राहणार आहेत. आतापर्यंत निवडणुकीत टेबलाच्या खालून पैसे देत होते. आतावरून पाच हजार रुपये देत आहेत. त्यांचे मंत्री नितीन गडकरी म्हणाले की अनुदान बंद होणार आहे. सरकार दिवाळखोर झालं आहे. कारण सगळे पैसे खर्च झालेत. लाडक्या बहिणींना विकत घेणार का आम्हाला सुरक्षा हवी आहे, असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे.
बदलापूरमध्ये झालेल्या बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे देश हळहळला. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला. यावरून प्रणिती शिंदेंनी सरकारवर निशाणा साधलाय. भाजप बदलापूर घटनेतील भाजपचे दोन पदाधिकारी फरार आहेत. मात्र एका व्यक्तीचा एन्काऊंटर घडवला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या पुतळ्याच्या उभारणीत भ्रष्टाचार करणाऱ्या सरकारला तोंड दाखवायची लायकी राहिली नाही, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या आहेत.