ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आंबेडकर यांचे विधान : शिंदे व ठाकरेंमध्ये झाला समझोता

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झाले आहे तर काही भागात अद्याप मतदान बाकी आहे. त्याआधीच सत्ताधारी व विरोधकामध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु असून आता वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी एक विधान केले आहे.

दरम्यान प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या दोघांमध्ये समझोता झाला असून निवडणुकीनंतर एकत्र आले तर आश्चर्य मानू नका, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने त्यांचा उमेदवार कल्याणमध्ये लढणार आहे की नूरा कुस्तीचा आहे एवढे सांगावे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तर उद्धव ठाकरे अडचणीत आले तर मी त्यांना मदत केल्याशिवाय राहणार नाही असे नरेंद्र मोदी म्हणाले ठाकरेंच्या सेनेने भाजप सोबत समझोता केला आहे, असेही आंबेडकरांनी म्हटले आहे.

प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, उद्धव ठाकरे अडचणीत आले तर मी त्यांना मदत केल्याशिवाय राहणार नाही असं नरेंद्र मोदी म्हणाले. ठाकरेंच्या सेनेने भाजप सोबत समझोता केला आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे हे काँग्रेसचा प्रचार करत नाहीत हे काँग्रेसला लक्षात आले. ठाकरेंच्या सेनेने काँग्रेसला फसवले. काँग्रेसने देखील त्यांच्या सेनेपासून फारकत घेतली आहे, असे आंबेडकरांनी कल्याण लोकसभेचे वंचितचे उमेदवार डॉ. शहाबुद्दीन शेख यांच्या प्रचार सभेसाठी उल्हासनगरमध्ये म्हटले आहे. यावेळी त्यांनी भाजपसह उद्धव ठाकरेंवर देखील घणाघाती टीका केली.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ठाकरेसेनेचे ठाणे उमेदवार राजन विचारे यांनी पाठिंब्यासाठी पत्र देण्याच्या वृत्ताला प्रकाश आंबेडकर नकार दिला. तसेच सभेत त्यांनी मोदींसह ठाकरेसेनेवर टीका केली. ताज्या सर्वेक्षणात मोदी 400 पार नव्हेतर 280 वर आकडा आल्याचे आंबेडकर म्हणाले. 2014 व 2019 च्या निवडणुकीत दिलेले आश्वासन मोदी यांनी पाळले नसल्याने, नागरिकांचा भ्रमनिरास झाला. त्यामुळेच राज्यातील मतदानाची टक्केवारी घसरल्याचे आंबेडकर म्हणाले. ​​​​​​​

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!