सांगलीत अॅक्सीस बँकेंच्या कर्मचाऱ्याने घातला ग्राहकांना ९० लाखांचा गंडा
सांगली : सांगली जिल्ह्यातील अॅक्सिस बँकेच्या मिरज शाखेत कार्यरत असलेल्या एका व्यक्तीने १० ग्राहकांना तब्बल ८० लाखांना गंडा घातला आहे. याप्रकरणी मिरज शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोहिद अमीर रिकमसलत वय – २७ असे आरोपीचे नाव आहे. आरोपीवर ग्राहकांच्या खात्यातून पैसे काढून घेतल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मिरज शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
आरोपी हा सांगली जिल्ह्यातील अॅक्सिस बँकेच्या मिरज शाखेत कार्यरत आहे. आरोपी तोहिद रिकमसलत याच्याकडे बँकेच्या ग्राहकांना भेटून सेव्हिंग व करंट खाते उघडण्याची जबाबदारी देण्यात आली होती. दरम्यान, आरोपीने ग्राहकांचा विश्वास संपादन करून स्वत:च्या आर्थिक फायद्याकरीता ग्राहकांकडून काही रक्कम घेतली. तसेच ग्राहकांच्या खात्यावरूनदेखील त्याने काही रक्कमही काढून घेतली. त्याने एप्रिल २०१९- १६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत ग्राहकांची 90 लाख 61 हजार 128 रुपयांची फसवणूक केली आहे.
ग्राहकांच्या तक्रारीनंतर आऱोपीची चौकशी केला असता तो दोषी आढळून आला. त्यानंतर बँक कर्मचारी साजिद बाबालाल पटेल यांनी आरोपीविरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.