ध्यास विश्वसार्ह बातमीचा

विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही ; मुख्यमंत्र्यांचे टीकास्त्र !

मुंबई : वृत्तसंस्था

देशभरात सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी आतापासून उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे तर दुसरीकडे ठाकरे व शिंदे गटात एकमेकावर आरोप प्रत्यारोप सुरु आहे. नुकतेच रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे आज शिवसेनेच्या वतीने शिवसंकल्प अभियानाची सुरुवात होत आहे. “मिशन 48, शिवसंकल्प ध्येय भगव्या महाराष्ट्राचं.” ही टॅगलाईन घेऊन या संकल्प अभियानाला सुरुवात होत आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही रत्नागिरी दौऱ्यावर आलेत. या कार्यक्रमावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी आगामी लोकसभा निवडणूकांची रणनिती स्पष्ट केली.

“मुंबई ठाण्यासह सिंधुदुर्ग रत्नागिरी हे शिवसेनेचे दोन फुफुस आहेत. उदय सावंत आणि दीपक केसरकर यांनी मला खंबीर साथ दिली त्यांनी मंत्रीपद सोडले. आज खरी शिवसेना आपल्याकडे आहे, खोट्याच्या कपाळी गोटा अशी म्हण आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत कोकणी माणूस शिवसेनेला साथ देईल…” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. तसेच “विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आम्ही सत्तेसाठी नाही तर विचारांसाठी तत्वांची लढाई केलेली आहे. सत्तेपेक्षा विचार मोठे आहेत. बाळासाहेबांची संपत्ती नको मला त्यांची विचार हवे आहेत..” असेही शिंदे यावेळी म्हणाले.

“बाळासाहेबांना एक दिवसाचा पंतप्रधान व्हायचं होतं. त्या एका दिवसामध्ये राम मंदिराचा निर्णय आणि कश्मीरमधील 370 कलम काढून टाकायचं होतं. त्यांचे हे स्वप्न आता हे सरकार पूर्ण करत आहे. बाळासाहेब असते तर त्यांनी मोदीजींना शाबासकी दिली असती. पण आज काय ते टीका करतात राम मंदिराच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करत आहेत..” असा टोलाही त्यांनी लगावला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!