सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा अंगणवाडी महिला कर्मचारी युनियनच्या वतीने अतुल दिघे याच्या नेतृत्वाखाली जिल्हा अध्यक्षा पार्वती स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध मागण्यासाठी उपजिल्हाधिकारी स्मिता पाटील यांना निवेदन देण्यात आले. येत्या ४ डिसेंबर पासून अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याचे यावेळी जिल्हाध्यक्ष पार्वती स्वामी यांनी सांगितले.
सदरचे निवेदन देताना सरिता मोकाशे, माया नष्टे, नंदा जाधव, जया पंडित, संगीता आगलावे, कल्पना कांबळे, रेश्मा मुलाणी, संगीता रुपनवर, मेघा पवार, सुषमा धाईंजे, उज्वला क्षीरसागर, शारदा मस्के, भिवराबाई बोराटे, अर्चना शिंगाडे, पद्मिनी नलवडे, सुमन शेंडे सुप्रिया धाईंजे, कोमल पिसे यासह शेकडो महिला उपस्थित होत्या.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या २५ एप्रिल रोजी ग्रॅज्युटीबाबत दिलेला अंतिम निकालाची अंमलबजावणी करावी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांची पदे ही वैज्ञानिक पदे असून त्यांना मिळणारा मोबदला हा वेतनच आहे, तरी त्यानुसार त्यांना शासकीय कर्मचारी घोषित करून त्या अनुषंगाने येणारी वेतन श्रेणी भविष्य निर्वाह निधी आदी सामाजिक सुरक्षा देण्यात यावी.