ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अंगणवाडी सेविकांसाठी गुडन्यूज, १६३ कोटींचा निधी मंजूर

मुंबई वृत्तसंस्था 

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांसाठी गुड न्यूज  आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांचे डिसेंबर महिन्यातील मानधन आणि प्रोत्साहन भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने यासाठी तब्बल १६३.४३ कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी दिली आहे. त्यामुळे आता अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना लवकरच भत्त्याचे पैसे मिळणार आहेत.

नवी मुंबईमधील एकात्मिक बालविकास सेवा यांच्या अखत्यारीत एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते आहे. पण केंद्र सरकारकडून वेळेत निधी प्राप्त होत नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांचे मानधन वेळेत देता येत नाही. हा निधी वेळात देता यावा यासाठी अपर मुख्य सचिवांच्या (वित्त) अध्यक्षतेखाली २ जून २०१७ रोजी महत्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची रक्कम केंद्रीय सहाय्य यांच्याकडून प्राप्त होत असली तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयानुसार अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचे डिसेंबर २०२४ या महिन्याचे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी एकूण १६३.४३ कोटी रुपयांचा निधी वितरित आणि खर्च करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता लवकरच अंगणवाडी सेविकांना त्यांचे थकीत मानधन लवकर मिळण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारच्या निर्णयामुळे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचे डिसेंबर २०२४ या महिन्याचे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता देण्यासाठीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी महायुती सरकारने अंगणवाडी सेविकांच्या आणि मदतनिसांच्या मानधनामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला होता.

अंगणवाडी सेविकांना सध्या १० हजार रुपये आणि मदतनीसांना ५ हजार रुपये मानधन दिले जाते. सरकारने अंगणवाडी सेविकांचे मानधन ५ हजार रुपयांनी आणि मदतनीसांचे मानधन ३ हजारांनी वाढवणार असल्याची घोषणा केली होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!