कुरनूर : चिक्केहळ्ळी सारख्या ग्रामीण भागामध्ये इंग्रजी शाळेची सुरुवात करून आधुनिक काळामध्ये इंग्रजी विषयाचा ज्ञान देऊन विद्यार्थ्यांना दिशा देण्याचे काम मुख्याध्यापिका शबाना मुल्ला व इरफान मुल्ला आणि सरपंच चिक्केहळ्ळी येथील ग्रामस्थ करत आहेत हे अतिशय कौतुकास्पद आहे. वास्तविक पाहता शहराच्या ठिकाणी जास्त इंग्रजी शाळा बघायला मिळतात परंतु ग्रामीण भागामध्ये इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मुलांना मिळत नाही त्यामुळे ते पाठीमागे राहतात असे प्रतिपादन काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्ष युवा नेत्या शितल म्हेत्रे यांनी केले. ते व्हीजन इंडिया प्रि-स्कुलचा वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन व प्रतिमापुजन तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा युवा नेत्या शितल म्हेत्रे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चिक्केहळ्ळीचे सरपंच फातुर्मा पटेल उपस्थित होते.
पुढे बोलताना म्हेत्रे म्हणाले की मराठी आपली मातृभाषा आहे ती आपण जपलीच पहिजे. परंतु इंग्रजी विषयाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण आजच्या स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर इंग्रजी विषयाचा ज्ञान असलेच पाहिजे. असेही म्हेत्रे म्हणाल्या. तत्पूर्वी प्रि-स्कूलच्या मुख्याध्यापिका शबाना मुल्ला यांनी शितल म्हेत्रे यांचा सत्कार केला. त्यानंतर शितल म्हेत्रे यांच्या हस्ते शाळेतील विदयार्थ्यांना पारितोषिक वितरित करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार स्वामीराव गायकवाड, रमेश भंडारी, माजी तंटामुक्त अध्यक्ष कल्लप्पा ढोणे तसेच चिक्केहळ्ळीचे प्रगतशील शेतकरी बाबु पुजारी व शबसण्णा निरोळे, इरफान मुल्ला व प्रि-स्कुलचे शिक्षकवर्ग, चिक्केहळ्ळी गावचे ग्रामस्थ व पालकवर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.