सोलापूर दि. २५: येथील अनुभव प्रतिष्ठानच्यावतीने गुढीपाडवा निमित्त गरीब गरजू अनाथ आणि बेघर 101 लोकांना पुरणपोळी वाटप करण्यात आले. सिद्धेश्वर मंदिरातील संमत्ती कट्ट्याजवळ उमेश्वर लिंगाची पूजन करून उपाक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश कासट, शिवानंद नसली साहेब, रमेश हुमनाबादकर, शिवानंद सावळगी, महालिंग दुलंगे, श्रीदेवी तालिकोटी, संगीता नागणसुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आले.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी संतोष शिवशिंपी, अभिषेक दुलंगे, समर्थ शिवशिंपी, गणेश येळमेली, सोमनाथ कालदीप, देवा सावळगी, सचिन लोणी, शिवानंद नागणसुरे, शिवानंद भाईकट्टी, महेश भाईकट्टी, गणेश कालदीप, प्रसाद कालदीप, अजय हलकुडे, संकेत तालिकोटी, गोपी वंदाल, संतोष कालदीप यांनी परिश्रम घेतले.