ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ज्येष्ठ रंगकर्मी शोभा बोल्ली यांची सिनेट सदस्यपदी नेमणूक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या अधिसभेवर वर्णी

सोलापूर : ज्येष्ठ रंगकर्मी शोभा बोल्ली यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या अधिसभेवर नेमणूक झाली आहे. महाराष्ट्रातील राज्य विद्यापीठांचे कुलपती तथा राज्यपाल महामहिम रमेश बैस यांनी शोभा बोल्ली यांच्या सांस्कृतिक कार्याची दखल घेऊन त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून निवड केली. महाराष्ट्र विद्यापीठ कायदा २०१६ सेक्शन २८(२) नुसार त्यांची नेमणूक राज्यपाल महोदयांनी केली आहे. या निवडीवरून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आह
शोभा बोल्ली या विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या समिती सदस्य आहेत. गेली चाळीस वर्ष त्यांनी अभिनय, दिग्दर्शन, नैपथ्य, अभिवाचन या माध्यमातून रंगभूमीची सेवा करत आहेत. ‘तो मी नव्हेच’ या नाटकात प्रभाकर पणशीकरांसोबत भूमिका साकारण्याची संधी त्यांना मिळाली. आज अखेर पन्नासेक नाटकांतून त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. महाराष्ट्र राज्य नाटक अनुदान मंडळावर सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे. नाटक, चित्रपट, अभिवाचन, मुलाखती, दिग्दर्शन अशा विविध अंगाने कलाक्षेत्रात सातत्याने त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. या कामासाठी त्यांना विविध पुरस्काराने गौरविले आहे. याच कार्याची दखल घेऊन माननीय राज्यपाल महोदयांनी त्यांची निवड सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभेवर केली. या निवडीबद्दल त्यांचे शैक्षणिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!