ध्यास विश्वसार्ह बातमीचा

लष्कराचे वाहन दरीत कोसळले : दोन जवान शहीद तर तीन गंभीर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशातील जम्मू- काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात शनिवारी लष्कराचे वाहन खोल दरीत कोसळून अपघात झाला. या अपघातात दोन जवान शहीद झाले. तर तीन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात बांदीपोरा जिल्ह्यातील सदर कूट पायीन भागाजवळ झाला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘जवानांना घेऊन जाणाऱ्या लष्कराच्या ट्रकला बांदीपोरा येथील सदर कूट पायीन भागाजवळ अपघात झाला. एका वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक खोल दरीत जाऊन कोसळला. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिस आणि सुरक्षा दल उपस्थित आहेत. बांदीपोरा जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. मसरत इकबाल वानी यांनी सांगितले, “येथे ५ जखमी जवानांना आणण्यात आले होते. त्यापैकी २ जवानांचा मृत्यू झाला. ३ गंभीर जखमींना पुढील उपचारांसाठी श्रीनगरला पाठवण्यात आले आहे.” लष्कराच्या वाहनाला अपघात होण्याची ही गेल्या काही दिवसांतील तिसरी घटना आहे. याआधी २४ डिसेंबर रोजी नियंत्रण रेषेजवळ लष्कराचे एक वाहन ३०० फूट खोल दरीत कोसळले होते. या दुर्घटनेत ५ जवान शहीद झाले होते. तर चालकासह ५ अन्य जवान गंभीर जखमी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!