कार्य सिद्धीस नेण्यासाठी आरोग्य उत्तम असणे गरजेचे; अक्कलकोट येथे मान्यवरांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उद्घाटन
अक्कलकोट,दि.२ : कुठलेही कार्य सिद्धीस नेण्यासाठी प्रत्येकाचे आरोग्य उत्तम असणे गरजेचे आहे सर्व संपत्तीत शरीर संपत्ती ही सर्व श्रेष्ठ संपत्ती आहे,असे प्रतिपादन खासदार डॉ.जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले.अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात
आज महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत भव्य मोफत वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिराचे उद्घाटन खासदार डॉ.जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजी
यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार सचिन कल्याणशेट्टी हे होते.याप्रसंगी व्यासपीठावर माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे,पंचायत समितीचे सभापती अँड आनंदराव सोनकांबळे,तहसीलदार बाळासाहेब सिरसट, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ प्रदिप ढेले,नगरसेवक महेश इंगळे,शिवसेना तालुकाप्रमुख संजय देशमुख, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दिलीप सिध्दे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष अविनाश मडिखांबे,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विन करजखेडे,वैद्यकीय अधीक्षक तथा कार्यक्रमाचे संयोजक डॉ.अशोक राठोड,रुग्ण कल्याण समिती सदस्य राजकुमार झिंगाडे, अंकुश चौगुले, बसवराज बिराजदार आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना आमदार कल्याणशेट्टी म्हणाले की,आज अक्कलकोट ग्रामीण वैद्यकीय टीमचे जितके कौतुक करावे तितके कमीच आहे.कारण तालुक्यात दिवसरात्र एक करुन तालुक्यातील कोरोना महामारीला हद्दपार करण्याचे काम वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विन करजखेडे व वैद्यकीय अधीक्षक डॉ.अशोक राठोडसह त्यांच्या टीमने केले आहे.माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे म्हणाले की,तालुक्यातील गरीब,गरजू व वंचितांना मदत व्हावी म्हणून जिल्ह्यात पहिल्यांदाच इतके भव्य मोफत आरोग्य शिबिर राबविण्यात आल्याने मी सर्व अक्कलकोट वैद्यकीय पथकाचे अभिनंदन करत असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.प्रदिप ढेले तर उपस्थितांचे स्वागत ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक राठोड यांनी केले.यावेळी सर्वरोग निदान शिबिराचा लाभ घेण्यासाठी अक्कलकोट शहर व तालुक्यातील बहुसंख्य नागरिकांनी गर्दी केली होती.शिबिराच्या पहिल्या दिवशी सोलापूर येथील दंत महाविद्यालय कडून पंधरा जणांचे पथक सहभागी झाले होते.पहिल्याच दिवशी दहा जणांना दाताची संपूर्ण कवळी,दाताचे एक्सरे
व सिमेंट भरण्यात आले.येत्या ५ मार्च पर्यंत सोलापूर येथील मोबाईल डेंटल व्हॅन सोबत असणार आहे.या शिबिरात विशेष तज्ज्ञांमार्फत रुग्णांची, तपासणी व निदान करण्यात येत आहे.तरी अक्कलकोट शहर व ग्रामीण भागातील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी अश्विन करजखेडे
यांनी केले आहे.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.प्रकाश सुरवसे तर आभार निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीकांत कुलकर्णी यांनी मानले.