ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यात अहंकारी सरकार तर मुंडे यांनी राजीनामा द्यावा : खा.शिंदे आक्रमक

सोलापूर : वृत्तसंस्था

राज्यातील बीड जिल्ह्यातील सरपंच खून प्रकरण चांगलेच तापले असतांना विरोधकांनी महायुती सरकारवर टीकास्त्र सोडत आहे. आता कॉंग्रेसच्या खा.प्रणिती शिंदे यांनी देखील महायुती सरकारवर टीकास्त्र सोडत मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
खा.शिंदे म्हणाले कि, काँग्रेसचे सरकार असताना वारंवार ज्या- ज्या वेळी मंत्र्यांचे राजीनामे मागितले गेले, त्या-त्या वेळी नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामे दिले जात होते. मात्र आता अतिशय निगरगट्ट आणि अहंकारी सरकार आहे. त्यामुळे ते लवकर हलतील, असे दिसत नसल्याचे प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे.

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या हत्येच्या आरोपावरून मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. मात्र या संदर्भात सरकारच्या वतीने कोणतीच भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. यावरून खासदार प्रणिती शिंदे यांनी सरकारवर टीका केली आहे. हे अतिशय निगरगट्ट आणि अहंकारी सरकार असल्याचे प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे. या सरकारने धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

महाराष्ट्रामध्ये दिवसाढवळ्या सरपंचाचे खुन होत आहेत. परभणी, बीड, बदलापूर यासारख्या घटना वाढत आहेत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचा आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. केंद्रात आणि राज्यात देखील भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. तेव्हापासूनच कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असल्याची टीका देखील त्यांनी केली. लॉरेंस बिश्नोई पासून वाल्मीक कराड पर्यंत सर्वच आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप देखील प्रणिती शिंदे यांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!