ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सायकल लवर्स क्लबच्या सायक्लोथॉन स्पर्धेमध्ये तब्बल 200 सायकल पटूंचा सहभाग

सोलापुर : शारदा प्रतिष्ठान आणि सायकल लवर्स क्लब च्या वतीने रविवारी सकाळी सोलापुरात आयोजित केलेल्या सायक्लोथॉन स्पर्धेमध्ये तब्बल 200 सायकल पटूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. रविवारी सकाळी सहा वाजता मुख्य समन्वयक महेश बिराजदार यांच्या हस्ते झेंडा दाखवून या स्पर्धेला प्रारंभ झाला. 50 किलोमीटर आणि 25 किलोमीटर अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली.

बाळे शिवाजीनगर येतील लक्ष्मी तरु गार्डनमध्ये या सायकल स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ पार पडला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व पोलीस उपायुक्त डॉक्टर विजय कबाडे या पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सायकल लवर्स ग्रुपचे पदाधिकारी महेश बिराजदार, डॉक्टर प्रवीण ननवरे इंजिनिअर अमेय केत, श्री अविनाश देवाडकर, प्रवीण जवळकर, येस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे, उपस्थित होते.

बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर सायकल संदर्भाच्या आपल्या आठवणींना उजाळा देत पर्यावरण रक्षणासाठी आणि स्वतःच्या सुदृढ शरीरासाठी सायकलीचे महत्त्व पटवून दिले… पोलीस उपायुक्त डॉक्टर विजय कबाडे यांनी या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ही सायकल लवर्स ग्रुपच्या टीमचे भरभरून कौतुक केले. सायकलवर प्रेम असणाऱ्या या ग्रुपने सोलापुरात प्रथमच असा मोठा इव्हेंट केल्याबद्दल शिवाजी सुरवसे यांनीही कौतुक केले…
प्रारंभी अमेय केत यांनी क्लब बद्दल तसेच इव्हेंट बद्दल माहिती दिली. डॉक्टर प्रवीण ननवरे यांनी या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वांचे आणि नियोजन करणाऱ्यां टीमचे आभार मानले.

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी चंद्रकांत दुधाळ बालाजी सुरवसे, प्रदीप कदम, अविनाश कुरापती, अद्वैत लवटे सुमित बार्डोळे गंगाधर कल्याणकर, अनुराग पाटील, विशाल बंसल यांच्यासह सायकल लवर्सच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

  • या स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे –

    50 किलोमीटर पुरुष गटप्रथम क्रमांक स्वप्नील नाईक, द्वितीय क्रमांक प्रकाश गायकवाड, तृतीय क्रमांक अभिजीत वाघचौरे,
    50 किलोमीटर महिला गटप्रथम क्रमांक डॉक्टर रूपाली जोशी,
    25 किलोमीटर पुरुष गट -प्रथम क्रमांक ओंकार हलगडे, द्वितीय क्रमांक अतुल बंदीवाडेकर, तृतीय क्रमांक रघुवीर फुलारी
    25 किलोमीटर महिला गटप्रथम क्रमांक विजया देवडकर, द्वितीय क्रमांक डिंपल कटारिया, तृतीय क्रमांक डॉक्टर तृप्ती राठी

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!