---Advertisement---

Good News ! भरघोस प्रतिसादामुळे अक्कलकोट ग्रँड फेस्टिवलची मुदत एक दिवसांनी वाढवली

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.२३ : अक्कलकोट डीलर्स असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या अक्कलकोट ग्रँड फेस्टिवलची मुदत आणखी एक दिवसांनी वाढवण्यात आली आहे. अर्थात हा फेस्टिवल २४ जानेवारी रोजी दुपारी १२ ते रात्री ९ पर्यंत चालू राहणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष दिनेश पाटील व सचिव गजानन पाटील यांनी दिली. गेल्या दोन वर्षापासून अक्कलकोटमध्ये ग्रँड फेस्टिवलला सुरुवात झाली आहे.यावर्षी देखील अपेक्षेपेक्षा मोठा प्रतिसाद अक्कलकोट शहर व तालुक्यातील जनतेने दिला आहे.

काल रविवार होता. सुट्टीचा दिवस असल्याने दिवसभर ग्राहकांची मोठी गर्दी होती. आज सोमवार आठवडा बाजार आहे. आज देखील मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. ग्राहकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे आणि विचारणामुळे असोसिएशनच्यावतीने उद्याचा एक दिवस वाढवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे.

तरी या फेस्टिवलचा लाभ तालुक्यातील जनतेने घ्यावा.या फेस्टिवलचे सह प्रायोजक बजाज फायनान्स आहेत. बजाज तर्फे सध्या ईएमआय फेस्टिवल ऑफर सुरू आहे. सर्व वस्तूंवर तात्काळ लोन मिळण्याची सोय या ठिकाणी करण्यात आली आहे तसेच लकी ड्रॉ ओपन सिस्टीम ठेवण्यात आली आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली. तरी या फेस्टिवलचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकाच्यावतीने करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!