ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कोरोमंडल एक्स्प्रेसची मालगाडीला धडक तब्बल २३३ प्रवाशांचा मृत्यू तर ९०० लोक जखमी

हावडा : ओडिशाच्या बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी कोरोमंडल एक्स्प्रेसचे सहा ते सात डबे रुळावरून घसरले आणि दुसर्‍या रुळावर येणाऱ्या ट्रेनला धडकले. या अपघातात आतापर्यंत २३३ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे, तर ९०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार या कोचमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी अडकले आहेत. स्थानिक लोकांकडून मदत व बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. शुक्रवारी सायंकाळी कोरोमंडल एक्सप्रेस ओडिशा राज्यातील बालासोरजवळ एका मालगाडीला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, एक्सप्रेसचे १८ डबे रुळावरून खाली उतरले.

हावडा ते चेन्नई धावणाऱ्या कोरोमंडल एक्सप्रेस रेल्वेचा शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास मोठा अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ओडिशा राज्यातील बालासोरपासून जवळपास ४० किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला. कोरोमंडल ट्रेन एका मालगाडीला धडकली. मालगाडीला धडकल्यानंतर स्लीपरचे ३ कोच सोडून अन्य डबे रुळावरून खाली उतरले. प्राथमिक माहितीनुसार एक्सप्रेसचे १८ डबे रुळावरून घसरले. अपघातानंतर तातडीने बचाव मोहीम राबवून ३०० प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!