ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भर सभेतच पोलिसांनी ओवैसींना दिली नोटीस

सोलापूर वृत्तसंस्था 

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून प्रचारसभा जोरदार होताय. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीही सोलापूरात प्रचार सभा घेतली. यावेळी असदुद्दीन ओवैसी यांची सभा सुरू असतानाच, स्टेजवरच पोलिसांनी त्यांना नोटीस दिली. त्यामुळे सभेस्थळी एकच चर्चा सुरु झाली.

बुधवारी (दि.१३) सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार फारुख शाब्दी यांच्या प्रचारसभेला खासदार असदुद्दीन ओवैसी आले होते. त्यावेळी इतरांचे भाषण सुरू असतानाच सोलापूर पोलिसांनी त्यांना स्टेजवरच नोटीस दिली. असदुद्दीन ओवैसी यांनी आपल्या भाषणात कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणार नाही, अशी प्रक्षोभक भाषा वापरू करू नये अशी नोटीस पोलिसांनी दिली. भारतीय नागरिक संहिता कलम १६८ प्रमाणे पोलिसांनी ही नोटीस दिल्याची माहिती आहे.

जेलरोड पोलिसांनी ओवैसींना प्रक्षोभक भाषण करू नये, अशी नोटीस दिली. ही नोटीस मराठीत होती. मला मराठी कळत नाही. इंग्रजी भाषेत नोटीस द्या. वाचून सही करतो, असे असदुद्दीन ओवैसी यांनी सांगितले. यातून पोलिसांची पळापळ झाली. यानंतर असदुद्दीन ओवैसी यांनी इंग्रजीतून आलेली नोटीस जाहीरपणे वाचताना त्यातील चुकाही वाचून दाखवल्या.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!