मुंबई : वृत्तसंस्था
बालपणापासूनच काँग्रेसी विचारांनी प्रभावित असणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेस पक्षाचा हात सोडत अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश झाला. दरम्यान चव्हाण यांचे समर्थक अमर राजूरकर यांनीही आज भाजपत प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी अशोक चव्हाण यांचे समर्थक मोठ्या संख्येने भाजप प्रदेश कार्यालयात उपस्थित होते.
महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेतृत्व ज्यांनी विधानसभा आणि लोकसभा गाजवली, दोन वेळा ज्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवले असे अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला असे देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केले आहे. अशोक चव्हाण यांच्या प्रवेशामुळे महायुतीची शक्ती वाढली आहे. यात कुणाला शंका नाही.
देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, मोदींजींच्या नेतृत्वात आपण काम करावे असे अनेक नेत्यांना वाटत आहे. देशाला विकसीत करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. यातूनच हा प्रवेश झाला आहे. मराठवाड्यासह महाराष्ट्रात अशोक चव्हाण यांच्या प्रवेशाने होणार आहे, असे फडणवीसांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, देशभरात माननीय मोदी यांनी ज्याप्रकारे भारताला विवकसीत करण्यासह स्वप्न पूर्णत्वाकडे नेण्याचे काम केले. जो बदल भारतात दिसत आहे त्यामुळे अनेक नेत्यांना आपणही मुख्य प्रवाहात काम करावे मोदींच्या नेतृत्वात काम करावे, देशाला पुढे नेण्याच्या प्रयत्नात आपणही वाटा द्यावा असे विचार आहेत. अशोक चव्हाणांनी प्रवेश केला. त्यांनी एकाच सांगितले विकासाच्या मुख्य मुद्द्यासाठी आलो पदाची अपेक्षा नाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठवाड्यात महायुतीला विशेष बळ मिळेल, असे देखील त्यांनी म्हटले आहे.