ध्यास विश्वसार्ह बातमीचा

लाचखोर अभियंत्‍याकडे आढळली तब्बल ३ कोटी रूपयांची मालमत्‍ता

बीड : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक शासकीय विभागात लाचखोरी मोठ्या प्रमाणात वाढली असतांना लाच रोखण्यासाठी मोठी पाऊले सरकार उचलत आहे. नुकतेच बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे 2022 मध्ये कार्यरत असलेले बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजयकुमार कोकणे (सध्या कार्यकारी अभियंता विकास विभाग क्रमांक चार अंधेरी मुंबई) यांना 22 फेब्रुवारी 2022 रोजी लाच घेताना पकडण्यात आले होते. या प्रकरणात अंबाजोगाई पोलीस ठाण्यात गुन्हा देखील नोंद करण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्या मालमत्तेच्या उघड चौकशीचे आदेश देखील प्राप्त झाले होते.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कोकणे यांच्या मालमत्तेची चौकशी केली असता त्यांनी कायदेशीर मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा 238% अधिक रकमेची अपसंपदा संपादित केली असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या पत्नी व स्वतःच्या नावे 3 कोटी 2 लाख 64 हजार रुपयांची मालमत्ता असल्याचे निष्पन्न झाले आहे.
आता या प्रकरणात कोकणे यांच्यासह त्यांच्या पत्नी सौ ज्योती कोकणे यांच्याविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक युनुस शेख हे पोलीस उपाधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!