मारुती बावडे
अक्कलकोट, दि. १६ : आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त चपळगाव येथील बसवनगरमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय करून राष्ट्रवादी पदवीधर संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रा.राजरतन बाणेगाव यांनी गावाप्रति सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. या उपक्रमाचा शुभारंभ राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी सरपंच उमेश पाटील, हन्नुरचे युवा नेते विश्वनाथ भरमशेट्टी, युवा नेते बसवराज बाणेगाव,जेष्ठ नेते महादेव वाले, शिवराज स्वामी, रियाज पटेल, महेश पाटील, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष माणिक बिराजदार, शहर उपाध्यक्ष स्वामीनाथ चौगुले, शंकर व्हनमाने, कार्यक्रमाचे आयोजक राजरतन बाणेगाव, सोमशंकर बाणेगाव आदी मान्यवरांची उपस्थित होती.
बाणेगाव परिवार व मित्र मंडळ चपळगाव,भूमिपुत्र शेतकरी संघटना चपळगाव, समस्त चपळगाव ग्रामस्थ,राष्ट्रवादी पदवीधर संघटना अक्कलकोट व पर्यावरण संरक्षण गतिविधि सोलापूर यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सदरचा कार्यक्रम कोरोनाचे सर्व नियम पाळून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला.यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सिद्धे यांनी बाणेगाव यांनी सुरू केलेल्या उपक्रमाचे कौतुक केले आणि आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ अशा प्रकारचे कार्य करून गावची समाजसेवा त्यांनी केली असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना सरपंच उमेश पाटील यांनीही बाणेगाव यांनी घेतलेल्या निर्णयाचे कौतुक करत अशाच प्रकारचे सामाजिक कार्य त्यांच्या हातून घडावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.यानिमित्त पाणपोई तसेच वृक्षारोपणाचा कार्यक्रम सरपंच उमेश पाटील यांच्या हस्ते पार पडला.या कार्यक्रमास चपळगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.