ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मध्यरात्री अशोक चव्हाणांनी घेतली जरांगे पाटलांची भेट

जालना : वृत्तसंस्था

राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक असतांना शनिवारी मध्यरात्री अचानक आंतरवाली सराटीमध्ये भाजप नेते अशोक चव्हाण यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. यावेळी दोघांमध्ये बैठक देखील झाली. विशेष म्हणजे रात्री 11.30 वाजता सुरू झालेली चर्चा मध्यरात्री 1.30 वाजता संपली. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या असून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

 

दरम्यान, या भेटीवर स्वतः अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ”मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस करायला आलो होतो. सुरुवातीला उद्धव ठाकरे आणि मी आलो होतो. त्यावेळी भेट झाली होती. हा मराठा समाजाचा विषय आहे आणि चर्चा करून मार्ग निघाला पाहिजे. सद्यस्थितीवर मार्ग कसा काढायचा यावर चर्चा करण्यासाठी आलो होतो”, असे चव्हाण म्हणाले. तसेच मराठा आरक्षण, लोकसभा निवडणूक याचा काही विषय नाही आणि मी निवडणुकीत उमेदवार पण नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

तर मनोज जरांगे यांनी देखील या भेटीवर भाष्य केले आहे. अशोक चव्हाण मला भेटायला आले होते. सरकारकडून आले आहेत का? असं मी आधी त्यांना विचारले असे जरांगे यांनी सांगितले. तसेच सरकारकडून आंदोलकांवर दबाव आणून विनाकारण गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप त्यांनी अशोक चव्हाणांसमोर केला. अनेकांना पोलिस प्रशासन विनाकारण चौकशीसाठी बोलवत आहे असेही जरांगेंनी अशोक चव्हाण यांना सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!