ध्यास विश्वसार्ह बातमीचा

एटीएसची मराठवाड्यात मोठी कारवाई : तीन तरुण दहशतवादी कृत्याच्या तयारीत असतांना अटकेत

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था

राज्यात विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून नुकतेच एनआयए आणि एटीएसने संयुक्त कारवाई करीत छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथून तिघांना ताब्यात घेतले आहे. ते तिघेही दहशतवादी कृत्य करण्याच्या तयारीत असल्याचा संशय असून जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती मिळत आहे.

महाराष्ट्रात शुक्रवारी (दि. ४) रात्री एनआयए आणि एटीएसने संयुक्त कारवाई केली. यात छत्रपती संभाजीनगर, मालेगाव आणि जालन्यात छापे टाकले. जालना येथील गांधीनगर येथून एकाला, छत्रपती संभाजीनगर शहरातील आझाद चौका जवळून एकजण आणि एन-६ परिसरातून एक अशा तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ते देश विघातक कृत्य करण्याच्या तयारीत होते. त्यांचा देश-विघातक कृत्यात सहभाग असल्याचा संशय आहे. संबंधित तरुणांना ताब्यात घेतले असून तीनही ठिकाणी घटनास्थळी पंचनामा सुरू आहे. दरम्यान, देशभरात अनेक ठिकाणी एकाच वेळी कारवाई सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, हे संशयीत जम्मू-कश्मीरमधील दहशतवादी संघटनांशी संबंधित आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!