ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महाराष्ट्रात एटीएसचे पुन्हा धाडसत्र, पनवेलमधून पीएफआयच्या ४ कार्यकर्त्यांना अटक

मुंबई : महाराष्ट्र एटीएसने पनवेलमधून पीएफआयच्या ४ कार्यकर्त्यांना अटक केली आहे. यात पीएफआयच्या सचिवाचाही समावेश आहे. पनवेलमध्ये रात्री उशिरा कारवाई करत एटीएस पथकाने चौघांना ताब्यात घेतले आहे. दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवून प्रशिक्षण दिल्याचा आरोप पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर ठेवत तपास यंत्रणांनी गेल्या काही दिवसांपूर्वी देशातील अनेक शहरांमध्ये छापेमारी करत पीएफआयच्या कार्यकर्त्यांना अटक केली होती. त्यानंतर केंद्र सरकारनं या संघटनेवर पाच वर्षांची बंदी घातली होती. तरीदेखील संघटनेचा प्रचार व प्रसार करण्याचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पनवेलमधून अटक करण्यात आली आहे.

पीएफआय संघटनेच्या बॅनरखाली चौघे सभा घेत असल्याचे आढळून आले आहे. बंदी घातल्यानंतरही पीएफआय आपल्या संघटनेला पुढे नेण्याचा प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली या पीआयएफ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!